रोहा-कोलाड रस्त्याच्या रुंदीकरणात शेकडो झाडांची कत्तल ; दासभक्तांची मेहनत वाया

03 Feb 2023 14:30:37
Mumbai Roha Mahamarg 
 
रोहा |  मुंबई-गोवा हायवे या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा रोहा-कोलाड महामार्ग, सद्या रोहा-कोलाड मार्गाच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम जोरदार सुरु असून या रुंदीकरणात शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली असून या मार्गांवर रस्त्याच्या दोन्ही बाजूला डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे असंख्य दासभक्तांनी मेहनत घेऊन वृक्ष लागवड करून ती वाढवली. परंतु ती झाडे रस्त्याच्या रुंदीकरणात तोडण्यात आली. यामुळे दासभक्तांची मेहनत वाया गेली असून रस्ता रुंदीकारणाचे काम पुर्ण झाल्यानंतर या झाडाची लागवड पुन्हा करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
 
रोहा-कोलाड रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरु असून अपघाताच्या दृष्टीकोनातून या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम महत्वाचे असले तरी या कामाबरोबर तोडण्यात आलेली झाडे लागवड करणे तेवढेच महत्वाचे आहे. वृक्ष लागवड न केल्यास भविष्य काल कठीण आहे. रस्ता रुंदीकरण तोडण्यात आलेली झाडे तोडून ती विकण्यात आली परंतु तोडून विकलेल्या झाडांच्या बदल्यात रस्त्याचे काम पुर्ण झाल्यानंतर ती पुन्हा लागवड करावी असे प्रशासनाकडून का सांगण्यात येत नाही.?
 
मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल ते इंदापूर चौपदरीकरणाच्या रुंदीकरणाच्या नावाखाली असंख्य झाडांची कत्तल करून त्या झाडांच्या लाकडांची विक्री करून लाखो रुपये कमवले परंतु त्या बदलात कोणत्याही वृक्षाची लागवड केली नाही रस्तारुंदीकरणाचे काम गेली 13 वर्षापासुन सुरु असून या कामात कोणतेही प्रगती नाही परंतु या महामार्गावर तोडण्यात आलेली असंख्य झाडे पुन्हा लावली असतील तर ती बारा वर्षात मोठी झाली असतील परंतु नियोजन मात्र शुन्य असल्यामुळे कोणतेही कामे होतांना दिसत नाही.
 
दिवसेंदिवस पर्यावरणात बद्दल होत चालला असून पशुपक्षी यांच्या राहणीमानावर गदा येत आहे तर कधी ओला दुष्काळ गारपीठासह पाऊस, विविध स्वरूपातील वादळे, भूकंप निसर्गाचे बदलत जाणारे स्वरूप आदी घटकांचा आपणास सामना करावा लागत आहे. तसेच वाढते औद्योगिक प्रदूष यामुळे सुद्ध हवाही मिळत नाही यामुळे अनेक मोठं-मोठे आजार पसरत आहेत. यासाठी अद्याप वेळ गेलेली नाही निसर्ग साखळीत बाधा येऊ नये यासाठी कोणत्याही कारणासाठी तोडण्यात आलेली झाडे ही पुन्हा लागवड करावी पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन याबाबत जागरूक राहणे काळाची गरज आहे.
Powered By Sangraha 9.0