धक्कादायक : रायगड जिल्ह्यातून दर दिवशी एक ते दोन व्यक्ती होतात बेपत्ता

By Raigad Times    02-Feb-2023
Total Views |
Missing Image
 
अलिबाग । रायगड जिल्ह्यात व्यक्ती बेपत्ता होणे तसेच अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. रागाच्या भरात, भांडणामुळेे, प्रेम प्रकरणातून, वेडसरपणामुळे तसेच नैराश्येतून घरातून पळून जाण्याचे प्रकार वाढले आहेत. परिणामी दर दिवशी सरासरी एक ते दोन व्यक्ती बेपत्ता झाल्याचे गुन्हे पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविले जात आहेत.
 
मागील वर्षभरात रायगड जिल्ह्यात 533 जण बेपत्ता झाले. यामध्ये 233 पुरुष तर 300 महिलांचा समावेश आहे. बेपत्ता झालेल्यांपैकी 170 पुरुष तर 255 महिला अशा 425 जणांचा शोध पोलिसांनी घेतला आहे. तर उर्वरित 63 पुरुष व 45 महिला अशा 108 जणांचा शोध घेण्यात पोलिसांना अपयश आले.
 
तसेच या काळावधीत रायगड जिल्ह्यात 133 जणांचे अपहरण करण्यात आले. यामध्ये 36 मुले तर 97 मुलींचा समावेश आहे. यापैकी 34 मुले व 93 मुलींचा पोलिसांनी शेध लावला असून, उर्वरित 2 मुले व 4 मुलींचा अशा 6 जणांचा शोध लागला नसल्याचे स्षप्ट झाले आहे.
 
-----------
 
गुन्हे प्रकार - एकूण गुन्हे - उकल झालेले गुन्हे - उकल न झालेले गुन्हे
बेपत्ता - 533 - 425 - 108
अपहरण - 133 - 127 - 6