नोकरीची संधीः रायगडात ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

By Raigad Times    15-Feb-2023
Total Views |
Rojgar melava  
 
अलिबाग। जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड अलिबाग कार्यालयाकडून जिल्ह्यातील नामांकीत आस्थापनांकडील रिक्त पदांच्या भरतीसाठी www.mahaswyam.gov.in, यासंकेतस्थळावर गुरुवार दि.16 फेब्रुवारी 2023 रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित केला आहे.
 
या रोजगार मेळाव्यात 10 वी, 12 वी उत्तीर्ण, आय.टी.आय., डिप्लोमा, पदवी, इत्यादी पात्रताधारक नोकरी करण्यास इच्छुक उमेदवारांनी www.mahaswyam.gov.in या संकेतस्थळावर क्षेल डशशज्ञशी या टॅबवर जाऊन आपला णीशी खऊ वझरीीुेीव वापरून लॉग इन करावे. पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा या टॅबवर क्लिक करुन आपला जिल्हा निवडून आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध असलेल्या पदासाठी ना दणी करावी.
 
रोजगार मेळाव्यातील रिक्त पदांची माहिती www.mahaswyam.gov.in या वेबपोर्टलवर उपलब्ध आहे. जास्तीत जास्त बेरोजगार युवकांनी या ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त मिता पवार यांनी केले आहे.