सिंधुदुर्ग । भारतिय नौदल अधिकार्यांनी परिधान केलेले इपॉलेट्सवर आतां छत्रपती शिवाजी महाराजांची झलक पहायला मिळणार असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशाशी नौदल ध्वज जोडण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचं झालं आहे. दरवर्षी 4 डिसेंबरला साजरा होणारा नौदल दिन यावर्षी जिल्ह्यात सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साक्षीने साजरा होत आहे. याच नौसेना दिनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित लावली.
राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि इतर मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौसेनेचं कौतूक करत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं.
छत्रपती शिवाजी महाराजांना समुद्राच्या सामर्थ्याचे महत्त्व माहित होतं. त्यांच्या घोषणेचा अर्थ होता, ‘जो समुद्रावर नियंत्रण ठेवू शकतो तो सर्वात शक्तिशाली आहे, असं शिवाजी महाराज म्हणायचे, असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने राष्ट्र परावलंबीपणाची मानसिकता सोडून पुढे जात आहे.
आमच्या वारशाचा अभिमान बाळगून, मला घोषित करताना अभिमान वाटतो, की भारतीय नौदलातील रँकचे भारतीय संस्कृतीनुसार नामकरण केले जाईल. आम्ही यावर देखील काम करत आहोत. आमच्या संरक्षण दलात महिलांची शक्ती वाढवत आहे. नौदलाच्या जहाजावर देशातील पहिल्या महिला कमांडिंग ऑफिसरची नियुक्ती केल्याबद्दल मी नौदलाचे अभिनंदन करू इच्छितो, असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
निराशावादाच्या राजकारणाचा पराभव करून, जनतेने प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्याची शपथ घेतली आहे. हे व्रत आपल्याला विकसित भारताकडे घेऊन जाईल. हे व्रत भारताचा इतिहास हा केवळ 1000 वर्षांच्या गुलामगिरीचा, पराभवाचा आणि निराशेचा नाही तर भारताचा इतिहास हा विजय, शौर्य, ज्ञान, विज्ञान, कला आणि आपल्या नौदल कौशल्याचा आहे, असंही मोदी म्हणतात.