दरवाढीमुळे माथेरानकरांच्या तोंडचे पाणी पळाले

02 Dec 2023 17:39:28
matheran 
 
माथेरान । देशात कुठे नाही एवढ्या वाढीव दराने माथेरान या पर्यटनस्थळ वरील नागरिकांना पाण्याचे दर असल्याने लहानमोठ्या दुकानदार, व्यावसायिक त्याचप्रमाणे घरगुती लॉज धारकांना आपले व्यवसाय करताना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.
 
त्यामुळे सर्व व्यावसायिक तसेच घरगुती नळ धारक पुरते वैतागले असून यापूर्वी नगरपरिषदेच्या माध्यमातून गावभर स्टँड पोस्टवर पाणी पुरवठा केला जात होता त्याचे संपूर्ण बिल नगरपरिषदेच्या माध्यमातून भरले जात होते ते स्टँड पोस्ट पुन्हा सुरू करा आम्हाला ही पाण्याची दरवाढ परवडणारी नाही असा स्थानिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
 
आजमितीपर्यंत माथेरान करांना नेहमीच जगण्यासाठी असो अथवा स्वतःच्या उन्नती साठी असो, आपल्या भावी पिढीला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी असो दरवेळी काही ना काही संघर्ष वा झळ सोसावी लागत आहे.त्यामुळे या सुंदर, रमणीय पर्यटनस्थळ असलेल्या इवल्याशा थंड हवेच्या गावाला विकासा पासून शापित असणार्‍या या गावातील स्थानिक भूमिपुत्रांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
 
एकीकडे याठिकाणी मुख्यत्वेकरून वाहतुकीच्या गहन समस्येमुळे सर्व जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने खरेदी कराव्या लागतात. वर्षातून जेमतेम ऐशी दिवसांच्या मुख्य सुट्ट्यांच्या हंगामात वार्षिक आर्थिक गणित सोडवितांना इथल्या स्थानिकांची पुरती दमछाक होत असते.
 
Powered By Sangraha 9.0