अलिबाग । रायगडचे जिल्ह्याधिकारी परवा अॅक्शनमोडमध्ये आल्याचे दिसले. त्यांनी जिल्हा क्रिडा संकूलासाठीचा निधी आणि जिल्हा रुग्णाालयाच्या विषयावरुन अधिकार्यांना फैलावर घेतले. तसेच या दोन्ही विषय तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश संबधीत अधिकार्यांना दिले आहेत. अलिबागमध्ये मच्छर पैदास खुपच वाढली आणि त्यामुळे आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सुचना त्यांनी अलिबागच्या मुख्याधिकारी यांना दिल्या आहेत.
अलिबाग । नेहुली येथील जिल्हा क्रीडासंकुलाच्या दुरूस्तीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनी ताबडतोब निधी उपलब्ध करून द्यावा. इतर कामांसाठी जिल्हा वार्षिक आराखड्यातून निधी द्यावा, असे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडासंकुल समितीचे अध्यक्ष डॉ. योगेश म्हसे यांनी सबंधीत आधिकार्यांना दिले.
जिल्हा क्रीडासंकुल समितीची बैठक बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकित जिल्हधिकारी यांनी जिल्हा क्रीडासंकुलाच्या परिस्थितीबाबत आढावा घेतला.
कोवीड काळात जिल्हा क्रीडासंकुलात कोवीड केंद्र सुरू करण्यात आले होते.
हे क्रीडासंकुल वापरण्यास पुर्णपणे बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे या संकुलाचा दोनवर्ष वापर होऊ शकला नाही. तसेच कोवीड केंद्र बंद केल्यानंतर देखील या संकुलाच्या इमारतींमध्ये कोवीडचे साहित्य पडून आहे. तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे क्रीडासंकुलाचा इनडोअर हॉल वापरता येत नाही.
हे संकुल वापरात होते तेव्हा वर्षाला किमान 10 लाख रुपये उत्पन्न मिळत होते. क्रीडासंकुल वापराविना पडून असल्यामुळे हे उत्पन्न देखील बंद झाले आहे. कोवीड केंद्राचे भाडे व संकुल दुरूस्ती 30 लाखाचा निधी द्यावी अशी मागणी क्रीडा अधिकारी यांनी पत्राव्दारे केली होती. परंतु हा निधी देण्यात आला नाही, आशी माहिती क्रीडा विभागकडून या बैठकीत देण्यात आली.
कोवीडसाठी जर हे क्रीडासंकुल वापरले होते तर त्याचे भाडे देणे, तसेच या संकुलाची दुरुस्ती करून ते पूर्ववत करून द्यायची जबाबदारी ही जबाबदारी संबंधीत अधिकर्यांची होती. हा निधी देण्याची जबाबदारी आरोग्य विभाग व जिल्हा शल्यचिकित्सक यांची आहे.
कोवीडसाठी आलेल्या निधीपैकी जो निधी शिल्लक असेल तेवढा निधी आरोग्य विभाग व जिल्हा शल्यचिकित्सक यांनी ताबडतोब उपलब्ध करून द्यावा तसेच नियोजन अधिकार्यांनी संकुलाच्या इतर कामांसाठी जिल्हा वार्षिक आराखड्यातून निधी उपलब्ध करून देण्यात यावा, असे आदेश जिल्हा अधिकार्यांनी या बैठकित संबंधीत अधिकार्यांना दिले.
क्रीडासंकुलाचे उत्पन्न वाढविण्यासाठी संपूर्ण क्रीडासंकुल वापरासाठी एखाद्या कंपनीला देतायेत असेल तर प्रयत्न करा. तसेचे जर एखाद्या क्रीडाप्रकाराचे मैदान कुणी वापरासाठी घेत असेल तर तसे प्रयत्न करा असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी दिले.