पेण । पेण तालुक्यातील पेण वाशी रस्त्यावर वाशी प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ वॅगनर कार झाडावर आदळुन झलेल्या अपघातात वॅगनर कार मधील संतोष म्हात्रे (उर्फ दर्यासागर ) हे ठार झाले तर दोघेजण जखमी झाले.
पळस्पे येथुन पेण वाशी मार्गावरुन वॅगनर कार भालकडे जाताना पेण वाशी प्राथमिक केंद्राजवळ चालकाचा कार वरील ताबा सुटुन रस्ताच्या कडेला झाडावर कार आदळुन झालेल्या अपघातात कारमधील संतोष रामचंद्र म्हात्रे ( दर्यासागर ) वय39 राहाणार भाल तामशी बंदर तालुका यांचा मृत्यू झाला तर कार चालक विश्वास नारायण पाटील 59 राहाणर ढोलपाडा, पेझारी अलिबाग,
प्रसाद काशिनाथ शिवदे वय 46 राहाणार आंबेपुर पेझारी तालुका अलिबाग हे जखमी झाले जखमीना संजिवनी हॅस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले.
अपघातानंतर कार जळुन खाक झाली या अपघाताची नोंद वडखळ पोलिस ठाण्यात कण्यात आली असुन सह्यायक पोलिस निरीक्षक अभिजित पाटील अधिक तपास करीत आहेत.