माणगाव | ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी; 8 ग्रामपंचायतींमध्ये विजय

महाविकास आघाडी 5, शिंदे गट 5, शिंदे गट-शेकाप 1, मांजरवणे विकास आघाडी 1, भाजपकडे 1 ग्रामपंचायत

By Raigad Times    08-Nov-2023
Total Views |
 mangoan
माणगाव । माणगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने सर्वाधिक 8 ग्रामपंचायतींवर विजय मिळवला. तर तालुक्यातील महाड विधानसभा मतदार संघातील निजामपूर विभागात राष्ट्रवादी काँग्रेस- उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महाविकास आघाडीने एकत्रित येत 5 ग्रामपंचायतींवर, शिवसेना शिंदे गटाने 5 ग्रामपंचायतींवर, शिंदे गट-शेकाप आघाडीने 1 ग्रामपंचातीवर, मांजरवणे विकास आघाडीने 1 ग्रामपंचायतीवर तर तालुक्यात भाजपने महाड विधानसभा मतदार संघातील गोरेगाव विभागातील एक ग्रामपंचातीवर विजय मिळवला.
 
तालुक्यातील या ग्रामपंचायतींचा निकाल ऐकण्यासाठी सोमवारी (6 नोव्हेंबर) तहसील कार्यालयाबाहेर विविध पक्षाच्या नेतेमंडळी, कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी गर्दी केली होती. यावेळी माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी केंद्र ठिकाणी व केंद्राबाहेर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
 
माणगाव तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका 5 नोव्हेंबर रोजी झाल्या. त्यापैकी तालुक्यातील दहिवली तर्फे गोवेले, काकल, चांदोरे, विहूले, कविळवहाळ बु. या 5 ग्रामपंचायतींच्या निवडणुका गावपातळीवर सरपंचपदासह पूर्ण बिनविरोध झाल्या.
 
या बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये दहिवली तर्फे गोवेले ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मुमताज युसूफ बंदरकर, काकळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ऋतिका रामदास गायकवाड, विहूले ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अस्मिता अनंत केंबळे, कविळवहाळ बु. ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्राची प्रमोद खेतम तर चांदोरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी साक्षी सुजित शिंदे हे बिनविरोध निवडून आले आहेत.
 
तर निवडणूक झालेल्या गोवेले ग्रामपंचायत सरपंचपदी राकेश यशवंत पांचाळ ( 505 मते -शिंदे गट), उणेगाव सरपंचपदी शुभांगी राजेंद्र शिर्के (967 मते - राष्ट्रवादी काँग्रेस), नागाव सरपंचपदी यशवंत चंद्रू कासरेकर (518 मते- भाजप), वारक सरपंचपदी वैष्णव वसंत साठे (797 मते-राष्ट्रवादी काँग्रेस) वडगाव सरपंचपदी सुषमा राजेश पानवकर (824 मते- शिंदे गट), शिरसाड सरपंचपदी प्रमोद पांडुरंग खेतम (986 मते- शिंदे गट), पळसगाव बु. सोनाली नितीन आंब्रे (679 मते- राष्ट्रवादी), कडापे सरपंचपदी अस्मिता जनार्दन शिळीमकर (674 मते- राष्ट्रवादी) गंगावली सरपंचपदी वैशाली विष्णू जाधव(545 मते- राष्ट्रवादी) अंबर्ले सरपंचपदी अंकुश नारायण उभारले (262 मते-शिंदे गट), वडवली सरपंचपदी मजहर उस्मान डावरे (931 मते- शिंदे गट), पुरार सरपंचपदी राहिला अब्दुल गफूर हुरजूक (336मते- राष्ट्रवादी), वणीमलईकोंड सरपंचपदी अलमास जाबीर पाल (297 मते- राष्ट्रवादी), भाले सरपंचपदी दत्ताराम सीताराम खांबे (1322 मते- माविआ), रातवड सरपंचपदी वैशाली गंगाराम जाधव (334 मते- राष्ट्रवादी) भुवन सरपंचपदी दिपक श्रीराम जाधव (811 मते- राष्ट्रवादी) मोर्बा सरपंचपदी शौकत युनूस रोहेकर (1734 मते- राष्ट्रवादी), जिते सरपंचपदी विमल राम होगाडे (857 मते- माविआ), खरवली सरपंचपदी संतोष रघुनाथ खडतर (820 मते- शिंदे-शेकाप आघाडी), मांजरवणे सरपंचपदी आस्मा अब्दुल जलील फिरफिरे ( 622 मते- मांजरवणे विकास आघाडी) लोणशी सरपंचपदी सिद्देश शांताराम पालकर ( 1154 मते- राष्ट्रवादी) हे निवडून आले आहेत.