महाड एमआयडीसीमध्ये स्फोटक आग!

11 कामगार होरपळल्याची भिती? सहाजण जखमी

By Raigad Times    04-Nov-2023
Total Views |
Mahad News
 
महाड । महाड औद्योगिक वसाहतच्या विस्तारीत क्षेत्रात असलेल्या ब्ल्यू जेट हेल्थकेअर या कारखान्यात ब्रॉयलरचा स्फोट होवून भीषण आग लागण्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. या स्फोट अकरा कर्मचारी होरपळ्याची भिती व्यक्त केली जात आहे. पोलीसांनी या कामगारांना बेपत्ता घोषीत केले आहे. तर सहा कर्मचारी जखमी झाले आहेत. स्फोट झालेल्या प्लॅस्टमध्ये स्फोटांची मालिका आणि वायूगळती होत असल्याने या बेपत्ता कामगारांचा शोध घेण्यात अडथळे निर्माण झाले होते.
 
कारखाना रासायनिक असल्याने स्फोट झालेल्या ठिकाणी पोहचणे आणि मदत कार्य करणे जिकीरीच झाल्याने तातडीने पुणे येथून एन.डी . आर एफ. च्या टिमला मदत कार्यासाठी प्राचारण करण्यात आल आहे. कारखान्याच्या आवारात आणि कारखाण्याबाहेर बेपता कामगारांचा आक्रोश आणि स्थानिक ग्रामस्थांचा कंपनी व्यवस्थापना विरोधात संताप व्यक्त होतांना पहावयास मिळाला. कारखान्याच्या पीपी प्लँटमध्ये हा स्फोट झाला आणि त्यानंतर आग लागली. त्यावेळेस 50 ते 55कामगार कर्मचारी कारखान्यात काम करित होते. या सर्वांना तातडीने कारखान्याच्या बाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या.
 
Mahad News
 
स्फोट आणि आगीच्या लपेट्यात सापडल्याने प्लँट ऑपरेटर विक्रम डेरे हा गंभीररित्या भाजला आहे. त्याच्यावर नांदगांवकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. स्वप्नील आंब्रे, राहूल गिरासे, निमाय पुरमू , मयूर निंबाळकर या कामगारांना वायूची बाधा झाली असून त्यांच्यावर एमएमए हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. तर या कारखान्यात दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी आलेल्या तंत्रज्ञावर महाड रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
 
ज्या प्लँटमध्ये स्फोट झाला त्या प्लँटमध्ये अकरा कामगार होरपळ्याची भिती व्यक्त होत आहे. पोलीसांच्या रिपोर्टनुसार ते बेपत्ता असल्याचे म्हटले आहे. आगीनंतर तेथे छोटे स्फोट, आग सुरुच असल्याने बचाव पथकांना या कामगारांपर्यंत पोहोचणे कठीण होऊन बसले होते. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी महाड एमआयडीसी, प्रिव्ही ऑरगॅनिक्स, खेड आणि महाड नगरपालिका, माणगाव, रोहा येथील अग्नीशमन बंब बोलाविण्यात आले आहेत. खाजगी टँकरद्वारे देखील पाणी पुरवठा करण्यात आला.
महाडचे प्रांताधिकारी ज्ञानोबा बाणापुरे, उपविभागिय पोलीस अधिकारी शंकर काळे, तहसिलदार महेश शितोळे तळ ठोकून असून बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहेत.
 
कारखाण्या बाहेर बेपत्ता कामगारांचे नातेवाईक आणि स्थानिक ग्रामस्थांचा उद्रेक पहाता कारखाण्यात चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महाडचे आमदार भरत गोगावले, रायगडचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी नातेवाईकांना धिर देण्याबरोबर सर्वानी सयंम बाळगत मदत कार्यात अडथळा होवू न देण्याची विंनती केली.
 
बेपत्ता कामगारांची नावे
जीवनकुमार चौबे, अभिमन्यू उराव, विकास महातो, शेषराव भुसारे, अक्षय सुतार (तळीये ता. महाड), सोमिनाथ विधाते, विशाल कोळी, संजय पवार (खरवली ता.महाड), अस्लम शेख, सतिश साळुंखे आणि आदित्य मोरे (चोचिंदे ता. महाड ) यांचा समावेश आहे.
 
पालकमंत्री देणार भेट
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रायगडचे पालकमंत्री उदय सामंत हे महाडकडे येण्यास निघाले. त्यांचा दौरा कार्यक्रमही माध्यमांना पाठविला. मात्र काही काळातच तो दौरा रद्द झाल्याचे कळविण्यात आले. आज ते घटनास्थळी भेट देणार आहेत.