कर्जत । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट झाले असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आपली नवी टॅगलाईन तयार केली आहे. ‘घड्याळ तेच; पण वेळ नवी’ या टॅगलाईनखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कर्जत येथे अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्धार करणार आहे.
दरम्यान, सुनील तटकरे हे प्रदेश अध्यक्ष असताना 2016 मध्ये राष्ट्रवादीचे दोन दिवसीय चिंतन शिबीर कर्जतमध्ये झाले होते, तर आता 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली संवाद शिबीर होणार आहे.
आगामी काळात लोकसभा आणि विधानसभा या मोठ्या निवडणुका यांना राज्य सामोरे जाणार आहे. त्यानंतर कदाचित महानगरपालिका, नगरपरिषद आणि जिल्हा परिषद पंचायत समित्या यांच्या सार्वत्रिक निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दर दोन वषारनी आपल्या पदाधिकारी नेते यांच्यासाठी शिबीर आयोजित करीत असते.
जिल्हा पातळीपासून राज्य पातळीपयरत साधारण 500 नेते यांच्यासाठी राज्यस्तरीय शिबीर रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील खांडपे येथे असलेल्या रेडिसन ब्ल्यू रिसॉट2र्समध्ये राष्ट ्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यस्तरीय दोन दिवसीय शिबीर या आयोजित केले जात आहे.
30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर या दोन दिवशी हे शिबीर पार पडणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्ह्यातील नेते सुधाकर घारे यांच्याकडे या संवाद शिबिराची नियोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे.तर प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी हे नियोजनात सहभागी आहेत.