हळदीला गेलेल्या तरुणाचा शॉक लागून मृत्यू

By Raigad Times    29-Nov-2023
Total Views |
sudhagad
 
सुधागड । हळदी समारंभासाठी उभारण्यात आलेल्या मंडपाच्या लोखंडी पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरला. या पोलला स्पर्श झाल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला. मंदार चोरगे असे त्याचे नाव आहे. त्याच्या मृत्यूने चोरगे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
 
सुधागड तालुक्यातील खडसांबले येथील मंदार अशोक चोरगे हा तरुण ठाणे येथील विटावा येथे हळदी समारंभासाठी गेला होता. याठिकाणी उभारलेल्या मंडपाच्या शॉर्टसर्किट होत होते.मंडपाच्या लोखंडी पोलाला मंदारचा स्पर्श होताच जोरदार झटका बसून तो बेशुद्ध अवस्थेत पडला. त्याला तातडीने उपचारासाठी कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दाखल करण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मावळली होती.
 
त्याचे दशक्रियाविधी मंगळवार 5 डिसेंबर रोजी खडसांबले येथे तर उत्तरकार्य गुरुवार 7 डिसेंबर रोजी खडसांबळे येथे करण्यात येणार आहे. नांदगाव पंचक्रोशीच्या वतीने त्यांला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.