गुरे चोरांची चेकपोस्टवर पोलीसांनाच धक्काबुकी

27 Nov 2023 15:46:36
 mhasla
 
म्हसळा । गोवंशाची टेम्पोमधून बेकायदा गुरे चोरणार्‍या दोघांनी पोलीसांनाच धक्काबुकी केल्याची धक्कादायक घटना म्हसळा येथे घडली. यानंतर पोलीसांनी या दोघांच्याही मुसक्या आवळल्या आहेत. तसेच 12 गुरांची मुक्तता केली आहे.मोबीन अ हसन शेख (रा. कुर्ला) मिराज अहमद कुरेशी हे दोघे म्हसळा येथून 12 गुरे एका टेम्पोमधून कोंबून बेकायदा वाहतुक करत होते.
 
साई पोलीस चेक नाक्यावर त्यांची गाडी पोलीसांनी अडवली असता या दोघांनी पोलीसांनाच धक्काबुकी आणि दमदाडी केली. घटनेचे गांभीर्य ओळखून म्हसळा पोलीस स्टेशनचे स.पोलीस निरिक्षक संदीपान सोनावणे यांनी विभागीय अधिकारी प्रशांत स्वामी याना हकीगत कळविली.
 
यांनतर म्हसळा पोलीस स्टेशनचे हेड कॉस्टेंबल संतोष चव्हाण, शिर्के, देवरे, घोंगाणे, सुर्यकांत जाधव, वर्षा पाटील, हंबीर श्रीवर्धन पीआय रिकामे, दिघी सागरी पीआय राजेद्र ढेबे घटनास्थळी पोहचले. यानंतर त्या दोघांना पोलीसांनी अटक केली आहे.दक्षिण रायगड मधील बहुतांश तालुक्यांतील ग्रामिण भागात मोठ्या प्रमाणावर गोवंश वर्गातील प्राण्यांची चोरी, अनधिकृत वाहतुक, हत्या या बाबत टोळ्या सक्रीय असून पोलीस प्रशासन सुद्धा सर्तक झाले आहे .
 
चक03 ऊ.त.5514 हा टेंपो आणि गोवंश महाड रायगड परिसरांतून आला अनेक भागांतून नागरिकानी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला, लोणेरे(गोरेगाव ) येथे नागरिकानी अडविण्याचा प्रयत्न केला होता.टेंपो चालकाने आडमार्ग पडकून म्हसळ्याकडे घेतला मात्र म्हसळा पोलीसानी अखेर या दोघांना ताब्यात घेतले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे.
Powered By Sangraha 9.0