खोपोलीत मराठा एल्गार

रायगडात वळवळ चालणार नाही -जरांगे पाटील

By Raigad Times    21-Nov-2023
Total Views |
 khopoli
 
खोपोली । रायगड हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य असून या ठिकाणी वळवळ करायची नाही असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. आम्हाला कोणाचेही विरोधात बोलायचे नाही असे सांगून 70 वर्षानंतर हा दिवस जवळ येत आहे.
 
त्यानंतर आपण आमने सामने येऊ असे सांगून असेही त्यांनी ठणकावले आहे. यावेळी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांचे नाव न घेता जोरदार टीका केली.रायगड जिल्हा सकल मराठा समाज यांच्यावतीने खोपोली येथील डीपी रस्त्यावर मैदानावर आयोजित केली होती.
 
त्यावेळी रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व तालुक्यातील मोठा जनसमुदाय या जाहीर सभेला उपस्थित होता. त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी तासभर जन समुदायाची संवाद साधला.आता माघार नाही आणि तोवर सरकारला सुट्टी देखील नाही. पण 70 वर्षे न सापडलेल्या नोंदी आता का सापडू लागले आहेत असा सवाल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला.
 
माझे शरीर साथ देत नाही, पण माझा जीव गेला तरी चालेल पण 24 घंटे काम करून वेळ कमी पडू लागला आहे. मला रस्ता द्या मी तुम्हाला आरक्षण मिळवून देणारच असे सांगून आता प्रत्येक गावात साखळी उपोषण सुरू झाले पाहिजेत असे आवाहन पाटील यांनी केली.
 
मराठा आरक्षणाची लढाई अनेक वर्षापासून सुरू आहे. मराठा समाजाची लेकरे अनेक वर्षे आरक्षणाची वाट पाहत आहेत. मराठा आरक्षणाचा लढा स्वतःच्या लेकरासाठी आहे. याच मराठा आरक्षणाचे अनेकांनी बलिदाने दिली आहेत. 42 बांधवांनी आणि जवळपास 50 बांधवांनी बलिदान दिले आहे. आरक्षणाच्या न्यायासाठी अखंड मराठा समाज 43 वर्षे झुंज देत आहे.
 
शासनाने मला एकाच प्रश्नाचे उत्तर द्यावे, 70 वर्षापूर्वी आमच्या समाजाला का आरक्षण दिले नाही. त्याचे नाव आम्हाला समजून घ्यायचे आहे असे सांगून लेकरू कोणाचेही असू दे त्यांच्यासाठी पुढे धावणारा असा आमचा मराठा समाज आहे. इतरांच्या लेकरांवर मदती साठी धावून जाणारा हा समाज असून कुणाच्याही लेकरांच्या पाठी मागे उभा राहणारा हा मराठा समाज आहे.
 
पूर्वी 75 वर्षे मदत करणारा आपल्या विरुद्ध उभा ठाकला आहे. हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे असे सांगून आरक्षण नसलेला मराठा आणि आरक्षण मिळविणारा मराठा या दोघांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यांचे हे षडयंत्र असून वेळीच सावध व्हा असे आवाहन ...
 
देखील जरांगे पाटील यांनी केले.
भुजबळ यांच्यावर टीका..
त्यांनी नाव न घेता म्हातार्‍या माणसाची कदर करतो,त्यांच्याविरुद्ध बोलत नाही.वय झाले की असे होते असे सांगून मी नाव न घेता बोलतो,तरी पण त्याला झोप येत नाही.त्यांना मी झोपत नाही तोवर झोप येत नाही असे बोलून त्यांना संताजी धनाजी दिसत आहेत तर मी काय करू.असे सांगून मी काही बोलत नाही,पण मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला तर हाणला म्हणजे समजा असे सांगून असे नाव न घेता छगन भुजबळ यांचे नाव न घेता टीका केली.
 
आपला जीव मराठा समाजासाठी..
पहाटे पाच पर्यंत सभा आणि सुरू उगवला की झाली सकाळ असे सांगून मला माझ्या आयुष्याचे काहीही करायचे नाही असे सांगून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी माझा लढा आहे आणि तो आरक्षण मिळाल्यानंतर थांबेल असे यावेळी जाहीर केले. माझ्या रक्तात मराठा आरक्षणाचा भिनले असून सरकारने माझ्या शिक्षणावर तीन दिवस खर्च केले आहेत.बारावी शिकलेले आहेत ते शोधायला सरकारला अनेक दिवस लागले आणि हा मला पाचवी शिकलेला म्हणतो.
 
कोकणने बाजी मारली ..
कोकण ने या राज्याला काय दिले आहे, कोकणातील ही खोपोली येथील पहिली सभा अशी घेतली आहे की अनेकांचे इंडीकेटर पडले असेल असे बोलून त्यांनी दंगली घडवण्याचा प्रयत्न केला आहे तो हाणून पाडा असे आवाहन त्यांनी केले. स्वार्थापोटी भांडणे लावू लागले आहेत.
 
ग्रामीण भागात आजही ओबीसी आणि मराठा एकत्र..
ग्रामीण भागात ओबीसी बांधव आणि मराठा बांधव एकत्र नांदत आहेत.पण ते एकत्र असताना त्यांच्या मध्ये तेढ निर्माण करण्याचे काम राजकीय स्वार्थ साठी हे लोक तणाव लावू देत आहेत. त्यामुळे आपलेच बांधव आहेत असे सांगून तेढ निर्माण केले तर आपण शांत रहा असे आवाहन केले.
व्यसनापासून लांब रहा..
 
मायबाप मराठयांनी व्यसना पासून लांब रहा असे आवाहन करतानाच त्यांनी महाराष्ट्रात 29 लाख नोंदी मराठ्यांच्या सापडल्या आहेत अशी माहिती मिळाली असून त्यामुळे कुटुंब कुटुंब यांचा लाभ मिळणार आहे. म्हातार्‍याला वाटतंय आरक्षणात मराठा आले तर आपले स्व रक्षण जवळ आले आहे.आरक्षण मराठ्याला मिळालेच आहे असे समजा आणि आंदोलन करून डोक्यात राग घालू नका असे आवाहन जरांगे पाटील यांनी यावेळी केले.
गाव बंदी...
 
गावात या पण मस्ती नको असे गावातील बोर्ड फाडता तर आम्ही काय करू शकतो याचा विचार तुम्ही करू शकणार नाही. आम्ही डोक्यात घेतले तर आयुष्यभर तुला गुलाल लागू द्यायचे नाही, ऊस कापायला जायला लावू असे आव्हान देतानाच आम्हाला नडू नका असा थेट इशारा छगन भुजबळ यांचे नाव न घेता दिला.
 
पोरांचे पाय बांधून ठेवा
आपली मुलं घराच्या बाहेर गेली तर त्यांना विचारायची कुठे चालले. आपली मुलं नेत्यांच्या मागे जायला निघाली तर त्यांचे पाय बांधून ठेवा अशी सूचना केली. लेकरांच्या भविष्य बदलण्यासाठी मराठा समाजाचा प्रचार करायला लाजू नका असे आवाहन करताना हे सर्व 24 डिसेंबर पर्यंत हे काम थांबून नका असे आवाहन करताना पोरांचे भविष्य घडविण्यासाठी ताकदीने एकत्र रहा, मराठ्यांच्या एकाही पोराने आत्महत्या करायची आणि या पोरांसाठी हे आरक्षण मिळवायचे आहे. त्यामुळे हे आरक्षण यांच्या छतड्यावर बसून घेऊ, आक्रमक होऊन आंदोलने करू नका आणि शांततेत आंदोलने करा असे आवाहन करतानाच मराठ्यांना आरक्षण मिळवून देई पर्यंत एक इंच देखील मागे हटणार नाही असे आश्वासन मनोज जरांगे पाटील यांनी दिले.
25 डिसेंबर रोजी पुढची दिशा निश्चित होईल..
सरकारने आरक्षण नाही दिले तर दुसर्‍या दिवशी आंदोलनाची दिशा आपल्याला सांगितली जाईल असे यावेळी जाहीर केले. शिवाजी महाराज यांच्या गनिमी कावा रचून पुण्यावरून लाखोंची सभा यशस्वी केली.