रेवदंडा । अलिबाग तालुक्याती वाडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निवडून गेलेल्या नवनिर्वाचीत सरपंच सारिका पवार यांनी पदभार स्विकारला. तर उपसरपंचपदी जयेंद्र भगत यांची निवड करण्यात आली.
वाडगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत अजीत पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस व शिंदे गट शिवसेना यांच्या आघाडीने वर्चस्व मिळविले, आघाडीचे नेते जयेंद्र भगत यांचे मार्गदर्शन व प्रयत्नाने थेट सरपंच निवडणुकीत सारिका पवार यांचा विजय झाला.
यावेळी नवनिर्वाचीत सरपंच सारिका पवार यांनी पदभार स्विकारला, व त्याचे अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाची निवडणुक घेण्यात आली, यावेळी अलिबाग तहसिलदार यांची उपस्थिती होती. वाडगाव ग्र्रुप ग्रामपंचायत उपसरपंचपदासाठी जयेंद्र भगत यांची निवड करण्यात आली.
यावेळी अजीत पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस व शिंदे गट शिवसेना यांच्या आघाडीचे नवनिर्वाचीत सरपंच सारिका पवार, उपसरपंच जयेंद्र भगत, सदस्या सरिता जयेंद्र भगत, सदस्या शुभांगी मंगेश भगत, सदस्या रूपाली प्रसाद पाटील, सदस्या निलम नरेश थळे, सदस्य संतोष यशवंत बोले, सदस्या सजना विठु नाईक हे वाडगाव ग्रुप गा्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आले आहेत.