अलिबाग तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मानकुले सरपंच पदाचा पदभार शेकापच्या सरपंच जागृती

By Raigad Times    20-Nov-2023
Total Views |
 alibag
 
अलिबाग । ग्रुप ग्रामपंचायत मानकुले सरपंच पदाचा पदभार शेकापच्या सरपंच जागृती ज. म्हात्रे यांनी स्विकारला तसेच उपसरपंच पदी शे का प चे प्रल्हाद पाटील यांनी पदभार स्विकारला यावेळी त्यांचे स्वागत करताना शे का प च्या माजी आमदार पंडित पाटील यांनी केले.
 
तसेच आमदार जयंत पाटील, शे का प च्या माजी राज्यमंत्री मिनाक्षी पाटील, शे का प नेत्या चित्रलेखा पाटील, रा. जि. प. माजी उपाध्यक्ष आस्वाद पाटील, रा. जि. प सदस्या भावना पाटील, शे का प चे ज्येष्ठ कार्यकर्ते जगन्नाथ म्हात्रे, जयवंत म्हात्रे यावेळी पं.स. माजी उपसभापती प्रकाश पाटील, माजी सरपंच सिध्दनाथ पाटील, शे का प चे ज्येष्ठ कार्यकर्ते नंदकुमार पाटील, भरत पाटील, शहाजी पाटील, रघूनाथ म्हात्रे, राजकुमार म्हात्रे, नचिकेत म्हात्रे,ग्रामपंचायत सदस्या दिप्ती म्हात्रे व आजी माजी सदस्य तसेच खारेपाट व तालुक्यातील शेकापचे पदाधिकारी तसेच इंडिया आघाडीच्या काँग्रेसच्या उमेद्वार संगिता महेंद्र म्हात्रे व अन्य पदाधिकारी विविध मान्यवरांनी अभिनंदन केले.