रोहा-भुवनेश्वर येथे सिलेंडरचा स्फोट; तीनजण जखमी

By Raigad Times    14-Nov-2023
Total Views |
 roha
 
धाटाव । रोहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायत हद्दीतील कालवा रस्ता भुवनेश्वर येथील एका घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना सोमवारी घडली. सिलेंडरच्या स्फोटात तिनजण जखमी झाल्याचे समोर आले आहे.भुवनेश्वर कालवा रस्ता येथील रहिवासी मनोहर घोसाळकर यांच्या घरात सिलेंडरचा स्फोट झाले.
 
सिलेंडरच्या स्फोटाच्या दुर्घटनेत मनोहर घोसाळकर, सायली घोसाळकर, भावना घोसाळकर जखमी झाले, घर, घरातील साहित्याचीही मोठ्या प्रमाणात नुकसान झाली.सिलेंडर स्फोटाची माहिती समजताच अग्निशमन दल व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यातील जखमींना अधिक उपचारार्थ मुंबईला हलविण्यात आल्याची माहिती रोहा पोलिसांनी दिली.
 
roha
 
स्फोटानंतर शेजारी व नागरिकांनी वेळीच सतर्कता दाखवत आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला, हे प्रथमदर्शी समोर आले. घटनेचा अधिक तपास रोहा पोलीस करत आहेत. दरम्यान, ऐन दिवाळी सणात दुर्दैवी घटना घडल्याने घोसाळकर कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आले आहे, तर दानशूर लोकांनी घोसाळकर कुटुंबाला सहकार्य करावे असे आवाहन परीट समाजाचे रायगड जिल्हा युवा अध्यक्ष रविंद्र कान्हेकर यांनी केले आहे.