उरण । शुक्रवारी कळंबूसरे गावातील आवारात एका अजगराने गावातील कुत्रा गिळला होता. याची माहिती गावकर्यांनी सर्पमित्रांना दिल्यानंतर त्यांनी या अजगराला गवतातून खेचून बाहेर काढले. त्यावेळी कुत्रा गिळून बसलेल्या अजगराने तो न पचल्याने त्याने कुत्रा बाहेर फेकला.
मात्र अजगराने त्याला गिळण्यापूर्वी मारला होता. हा अजगर लांबीने लहान असला तरी त्याचे वजन 45 किलो पर्यंत होते. त्यामुळे तो हाताळणे अवघड झाले होते. तर ऑक्टोबर महिन्यात चिरनेर मध्ये एका अजगराने मांजर गिळली होती. त्यानंतर हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे यापूर्वी ही अनेक सर्प आढळले आहेत.
यामध्ये अजगरांचे प्रमाण अधिक आहे त्यामुळे उरण मध्ये अजगरांचे प्रमाण वाढले आहे. या सरपटणार्या प्राण्यांचे आदिवास असलेली जंगले नष्ट केली जात असल्याने हे प्राणी आपल्या भक्ष्याच्या शोधत नागरीवस्तीत येऊ लागले आहेत.त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
या अजगरला पाहून येथील महिलांनी धास्ती व्यक्त करीत माणूस पण गिळतील अशी भीती यावेळी बोलून दाखविली यावरून नागरिकांमध्ये किती भीतीचे वातावरण पसरले आहे. याची कल्पना येते. यापूर्वी चिरनेर मधर 50 किलो वजनाचा तब्बल साडेबारा फूट लांबीचा भला मोठा अजगर आढळला होता.