बोरघाटात रुग्णवाहिकेला आग, रुग्ण महिलेचा उपचाराविना मृत्यू

By Raigad Times    01-Nov-2023
Total Views |
 khopoli
 
खोपोली । मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवर एका रुग्णवाहिकेला अचानक आग लागून स्फोट झाल्याची घटना मंगळवारी घडली. या अपघातात रुग्णवाहिकेतील निलवा कवलदार या रुग्ण महिलेचा उपचाराविना मृत्यू झाला आहे.
 
मुबंई- पुणे एक्सप्रेस वेवरून एक रुग्णवाहिका रुग्णाला घेऊन पुण्याकडे जात असताना, बोरघाटात ती अचानक बंद पडली. त्यामुळे त्यातील रुग्ण महिला व तिचे नातेवाईक गाडीतून खाली उतरले. तेवढ्यात रुग्णवाहिकेने पेट घेतला. या आगीत रुग्णवाहिकेचा मोठा स्फोट झाला.
 
स्फोटात कोणीही दगावला नसला तरी रुग्णवाहिकेतील रुग्ण महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस, बोरघाट पोलीस, अपघातग्रस्त टीमचे सदस्य, देवदूत यंत्रणा, अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न केले.