मांडवा जेट्टी येथे रो-रो बोटीतून प्रवाशाने समुद्राच्या मारली उडी

बेपत्ता प्रवाशाचा शोध सुरू

By Raigad Times    09-Oct-2023
Total Views |
roro
 
अलिबाग | मुंबई - मांडवा,अलिबाग या जलमार्गावर रो-रो बोटीतून एका प्रवाशाने सोमवारी सकाळच्या सुमारास मांडवा जेट्टी जवळपास पाण्यात मारल्यामुळे बेपत्ता झाला आहे, यामुळे मांडवा जेट्टी परिसरात खळबळ माजली आहे.
 
मुंबई येथून सोमवार दि.९ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी आठ वाजता सुटलेली रो-रो बोट मांडवा कडे रवाना झाली होती, हि बोट मांडवा जेट्टी जवळपास आल्यानंतर एका प्रवाशाने समुद्रात उडी मारल्यामुळे पाण्यात बेपत्ता झाला आहे.
 
यामुळे बोटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये खळबळ माजली. याबाबत रो-रो कर्मचाऱ्यांनी मांडवा पोलिसांना कळविले असता मांडवा पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन बेपत्ता प्रवाशाचा शोध घेत आहेत.