तळा । तळा तालुक्यात विशेषतः तळा शहरात कुत्र्यांची संख्या कमालीची वाढली असून तळा नगरपंचायत डोळ्यावर पट्टी बांधून बसली आहे. गेल्या तीन महिन्यात म्हणजेच जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात एकूण ५० जणांचा चावा कुत्र्यांनी घेतला आहे.
जुलै महिन्यात १८ जणांचा, ऑगस्ट महिन्यात १६ जणांचा आणि सप्टेंबर महिन्यात १६ जणांचा चावा रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांनी घेतला आहे. विशेष म्हणजे तळा नगरपंचायत आणि कर्मचारी तसेच सत्ताधारी या गोष्टीकडे अजिबात गांभीर्यानी न बघता यावर कोणतीही उपाययोजना करण्याचा प्रयत्न करीत नाही. तळा नागरपंचायतीने विकास कामाचा धडाका लावला आहे.
मात्र अश्या जीवघेण्या गोष्टीकडे तळा नगरपंचायत आणि कर्मचारी तसेच सत्ताधारी डोळ्याला पट्टी बांधून बसले आहेत. यावर तातडीने उपायोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.