म्हसळा ; बिनविरोध निवडून आलेल्या 12 पैकी 8 ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व .

By Raigad Times    27-Oct-2023
Total Views |
 mahasala
 
म्हसळा । म्हसळा तालुक्यात 12 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत बहुतांश ग्रामपंचायतीमधील नागरिकांनी खासदार सुनिल तटकरे, महीला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्या विकास कामांना प्राधान्य देत त्यांचे हात मजबुत केले आहेत.
 
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकित म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी कायम राहिली असल्याने हि लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीची नांदी असल्याचे बोलले जात आहे.बिनविरोध निवडून आलेल्या 12 ग्राम पंचायत पैकी 8 ग्रापंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे तर एका ठिकाणी ग्राम विकास आघाडीचा सरपंच बिनविरोध निवडून आला आहे.
 
तालुक्यात निवडणूक लागलेल्या तीन ग्राम पंचायतीमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसच बाजी मारणार असल्याची चर्चा आहे.तालुक्यातील 12 ग्राम पंचायतीचे सार्वत्रिक निवडणुकित म्हसळा तालुक्यात नेवरुळ, घूम, जांभुळ, सालविंडे, वरवठणे, वारळ, भेकर्‍याचाकोंड, कुडगाव, पांगलोळी, कोलवट, ठाकरोली, आडी महाड खाडी या 12 ग्राम पंचायतीमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे.
 
12 ग्राम पंचायतीपैकी नेवरुल, घूम,ठाकरोली,जांभुळ, आडी महाड खाडी, कुडगाव, साळवींडे या सात ग्राम पंचायतीच्या निवडणूका बिनविरोध झाल्या आहेत तर पांगलोली ग्राम पंचायतीमध्ये सरपंच आणि अन्य सहा सदस्याची निवड बिनविरोध झाली आहे. दिनांक 25 ऑक्टोंबर रोजी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी साळविंडे ग्राम पंचायतीचीमध्ये सरपंच आणि सदस्य पदासाठीचे सर्वच अर्ज मागे घेतले असल्याने साळविंडे ग्राम पंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली असून 12 ग्राम पंचायत पैकी 9 ग्राम पंचायतीचे सरपंच आणि सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.
 
पांगलोळी ग्राम पंचायतीमध्ये प्रभाग क्रमांक दोन मध्ये एक सर्वसाधारण आणि दोन सर्वसाधारण महीला राखीव जागांसाठी निवडणूक लागली आहे.मोठ्या लोकवस्तीचे वारळ,वर वठ्णे आणि कोलवट येथे सरपंच पदासाठी आणि काही ठिकाणी सदस्य पदासाठी निवडणूक होणार आहे.
 
भेकर्‍याचा कोंड येथे ग्राम विकास आघाडीचे मोहन शिंदे हे सरपंचपदी बिनविरोध निवडून आले आहेत. बिनविरोध निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंचामध्ये नेवरुळ ग्राम पंचायत सरपंच श्वेता विनोद लटके, घूम सरपंच साक्षी सतिश घोले,जांभुळ सरपंच किरण गणपत मोरे, कुडगाव सरपंच संतोष गणपत रटाटे, आडी महाड खाडी सरपंच सलोनी सचिन खोपकर, सालविंडे सरपंच उदेश सखाराम पारदुळे, ठाकरोळी श्वेता रमेश जाधव, पांगलोली बेबी संतोष कांबळे या आठ सरपंचांचा सामावेश आहे.
 
निवडणूक लागलेल्या वारळ, कोळवट आणि वरवठणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसची थेट लढत शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या बरोबर होणार आहे. वारळ ग्राम पंचायतमध्ये सरपंच पदासाठी तीन महीला उमेदवारानी नामनिर्देश अर्ज दाखल केला असून येथे सेनेच्या रेश्मा रमेश खोत यांची थेट लढत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कविता महेंद्र पेरवी यांच्या बरोबर होणार आहे तर अपक्ष म्हणून मधुमती तीवरेकर या लढत देणार आहेत.
 
कोळवट ग्राम पंचायत मध्ये केवळ सरपंच आणि एका सदस्य पदासाठी निवडनुक होणार आहे येथे सरपंच पद अनु. जाती जमाती करीता राखीव आसुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या येलवे सुवर्णा सुनिल यांची लढत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या मोहिते स्मिता प्रकाश यांच्या बरोबर होणार आहे तर प्रभाग क्रमांक 1 मध्ये सदस्य पदासाठी निवडुक होणार आहे.