गोठ्यात घुसून बिबट्याने केला गायीवर हल्ला.

By Raigad Times    21-Oct-2023
Total Views |
shreewardhan
 
श्रीवर्धन । तालुक्यातील सायगाव येथील शेतकर्‍याची गोठ्यात बांधून ठेवलेली गाय बिबट्याने मारुन टाकल्याची घटना घडली आहे. यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
 
श्रीवर्धन हरिहरेश्वर मार्गावरील कामत फार्म रिसॉर्टचे मालक अमित कामत व मानसी कामत यांनी देशी गायी पाळलेल्या आहेत. बुधवारी रात्री एका बिबट्याने या ठिकाणी गोठ्यात बांधलेल्या गायीवर हल्ला करुन तिला ठार मारले. गुरुवारी सकाळी कामगारांच्या ही बाब लक्षात आली.
 
बिबट्याच्या हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर श्रीवर्धन येथील वनविभागाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या ठिकाणी मानवीवस्ती देखील मोठ्या प्रमाणात आहे. मात्र बिबट्याच्या हल्ल्यामुळे या परिसरामध्ये दहशत निर्माण झाली आहे.