तळा, अलिबाग येथे भटक्या कुत्र्यांची दहशत

By Raigad Times    10-Oct-2023
Total Views |
tala alibag
 
तळा/ अलिबाग । गेल्या काही महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांनी उच्छांद मांडला आहे. तळा शहरात तिन महिन्यात 50 जणांना चावा घेतला आहे. तर अलिबागमध्ये एकाच दिवशी पंधरा जणांचा चावा घेतला. वारंवार घडणार्‍या घटनांमुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
 
तळा नगरपंचायतीत जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन महिन्यात एकूण 50 जणांचा चावा रस्त्यावर फिरणार्‍या मोकाट कुत्र्यांनी घेतला आहे. विशेष म्हणजे तळा नगरपंचायत आणि कर्मचारी तसेच सत्ताधारी या गोष्टीकडे अजिबात गांभीर्यानी न बघता यावर कोणतीही उपाययोजना करण्याचा प्रयत्न करीत नाही.
 
दुसरीकडे अलिबाग रायवाडी परिसरात भटक्या कुत्र्यांची मोठी दशहत पसरली आहे. विशेषता मॉर्निंग वॉकला जाणार्‍या पादचार्‍यांसह अनेक नागरिकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडत आहेत. रविवारी एकाच दिवशी पंधरा जणांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागलेे.
 
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाली आहे. त्यामुळे अलिबाग नगरपरिषदेने उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.