रिलायन्स पाईप लाईन प्रकल्प बाधितांचे आमरण उपोषण सुरू...

प्रजासत्ताक दिनी आत्मदहनाचा इशारा

By Raigad Times    25-Jan-2023
Total Views |
ALIBAG
 
अलिबाग । रिलायन्सच्या नागोठणे प्रकल्पासाठी टाकलेल्या गॅस वाहिनीने बाधित झालेले पेण व खालापूर तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकरी आजपासून अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत.
 
न्याय मिळाला नाही तर प्रजासत्ताक दिनी सामूहिक आत्मदहन करण्याचा विचार करतील, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. रिलायन्सच्या दहेज ते नागोठणे अशी इथेन गॅस वाहिनी टाकण्यात आली आहे. परंतु ज्या शेतकर्‍यांच्या जमिनीतून ही पाईप लाईन गेली आहे त्यांना आर्थिक मोबदला देताना त्यांच्यावर अन्याय झाला आहे. असे आंदोलकांचे म्हणणे आहे. अनेक प्रकल्प ग्रस्तांना यो1/2य मोबदला मिळालेला नाही, काही बाधितांना बनावट चेक देवून फसवणूक करण्यात आली, बाधित जमिनीची दुरुस्ती करून दिली नाही असे आरोप आंदोलकांनी केले आहेत. यासंदर्भात शासन स्तरावर अनेकदा बैठका झाल्या. त्यातून काहीच निष्पन्न न झाल्याने वेळोवेळी आंदोलने केली परंतु काहीच पदरात पडले नाही. इतर प्रकल्प बाधितांना ज्या दराने मोबदला देण्यात आला त्याच दराने या शेतकर्‍यांना मोबदला देण्यात यावा असे कंपनी प्रशासनाला कळवून देखील कंपनीने त्याची अंमबजावणी केली नाही. याबाबत जिल्हाधिकारी याना कळवून देखील शासनाकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. उलट शेतकर्‍यांना आश्वासने देत आजपयरत केवळ दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
 
अखेर 31 ऑक्टोबर रोजी पालकमंत्री उदय सामंत यांच्या जनता दरबारात तक्रार करण्यात आली परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. न्याय मिळत हा मार्ग निवडल्याचे आंदोलकांनी सांगितले. जर उपोषण करूनही न्याय मिळाला नाही तर प्रजासत्ताक दिनी (26 जानेवारी) पेण व खालापूर तालुक्यातील 248 बाधित शेतकरी आत्मदहन करण्याचा विचार करतील, असा इशारा प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीने जिल्हाधिकारी यांना लिहिलेल्या पत्रात दिला आहे.