रायगडचे नवे जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी पदभार स्वीकारला

By Raigad Times    24-Jan-2023
Total Views |
Collector Raigad
 
विविध शाखाप्रमुख, प्रांताधिकारी, तहसिलदारांकडून स्वागत
 
अलिबाग । रायगडचे नुतन जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी आज (24 जानेवारी) जिल्ह्याचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखाप्रमुखांनी तसेच क्षेत्रीय प्रांताधिकारी, तहसिलदारांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Collector Raigad
 
रायगडच्या जिल्हाधिकारीपदी सोमवारी (23 जानेवारी) डॉ.म्हसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीनंतर तातडीने त्यांना पदाचा कार्यभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार आज डॉ.म्हसे यांनी पदभार स्वीकारला जिल्ह्याची सूत्रे हातात घेतली. पदभार स्वीकारल्यानंतर, जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखाप्रमुख, क्षेत्रीय प्रांताधिकारी, तहसिलदार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Collector Raigad
 
2009 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले डॉ.योगेश म्हसे यांनी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशन लि.चे एमडी, महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट बोर्डचे चिफ ऑफिसर तसेच भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळलेली असल्याने, त्यांच्याकडे प्रशासकीय कामाचा अनुभव आहे.

Collector Raigad
 
विशेष म्हणजे भिवंडी मनपा आयुक्त म्हणून त्यांची कारकीर्द चांगलीच गाजली होती. निष्कलंक, शिस्तप्रिय, पारदर्शक कामामुळे डॉ.म्हसे यांना नागरिकांचा भरभरुन पाठींबा मिळाला होता.

Collector Raigad