डिफेन्स अकॅडमीचा आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये डंका

By Raigad Times    23-Jan-2023
Total Views |

raigad
अलिबाग | नुकत्याच कर्नाटक येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये डिफेन्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. सदर स्पर्धेमध्ये डिफेन्स अकॅडमी ने महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी संस्थापक श्री.समरेश सुनील शेळके , श्री.सनी सुरेश शेलार व श्री.अनिकेत सुभाष म्हामुणकर यांच्या नेतृत्वाखाली तब्बल २२ पदके जिंकली
.
या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत वरिष्ठ खुल्या गटात काता व कुमीते मध्ये अमिषा अनिरुद्ध भगत हिने दोन सुवर्ण पदक , तसेच अक्षय दिलीप पाटील यानी एक सुवर्ण व एक कांस्य पदक पटकावले तसेच सर्वसाधारण गटात अंतरा संदीप जाधव हिने दोन सुवर्ण पदक व पारितोष मिलिंद फिर्के याने दोन सुवर्ण पदक पटकावले . सोबत शुभम उमेश शिंदे याला एक सुवर्ण आणि एक रजत पदक, हर्षल दत्ताराम अहिरे याला सुवर्ण व रजत पदक, सत्यजित ग्यानबा शिराळे याला सुवर्ण पदक, सोहम राजेंद्र पाटील याला रजत व कांस्य पदक, मनस्वी सनी शेलार हिला दोन कांस्य पदक, आदेश अतुल तास्कर याला रजत पदक , सक्षम संजय बेलोस्कर याला कांस्य पदक व शुभ्रा संजय घेरडे हिला कांस्य पदक अशी भरघोस पदकांची कमाई केली.
 
सदर स्पर्धेसाठी विद्यार्थ्यानी गेले बरेच दिवस खूप मेहनत घेतली व त्या मेहनतीच्या जोरावर मैदानात उत्कृष्ट असे प्रदर्शन करून कौतुकास्पद कामगिरी केली असे संस्थापक श्री. समरेश शेळके यांनी सांगितलं.