उल्हास नदीच्या पात्रात सापडले शव...

By Raigad Times    23-Jan-2023
Total Views |
Ulhas nadi shav
 
कर्जत | कर्जत तालुक्यातील चांदई येथे उल्हासनदीच्या पात्रात आज २३ जानेवारी रोजी दुपारी एक पुरुष शव आढळून आले. पोलिसांना माहिती मिळताच कर्जत पोलिसांनी ते पाण्यावर तरंगत असलेले शव पाण्यातून बाहेर काढल्यावर त्याची ओळख पातळी आहे. ओडिसा राज्यातील सदर ५५ वयाची व्यक्ती असून कामगार म्हणून कर्जत तालुक्यात आली होती.
 
चांदई गावाच्या हद्दीतुन वाहणार्‍या उल्हास नदीमधील पाण्यावर दुपारी एक मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले होते. त्याची माहिती मिळताच कर्जत पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने ते पाण्यावर तरंगलेले शव नदीच्या पात्रातून बाहेर काढले. त्यानंतर स्थानिकांनी ओळख पटविण्याचा प्रयत्न केला असता सदर मृतदेह एका कामगाराचा असल्याचे समजल्यावर पोलिसांनी त्या व्यक्तीच्या नातेवाईक यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी ओडिसा या राज्यातून नोकरी साठी आलेला हा तरुण असून त्याचा भाऊ कशेळे भागात राहत असून तो आपल्या भावाकडे गेली अनेक वर्षे आपल्या घरी गेला नव्हता.मात्र पोलिसांनी माहितिगार यांच्या त्या व्यक्तीच्या भावाला कर्जत येथे बोलावून घेतले.
 
त्या व्यक्तीचा भाऊ कर्जत पोलीस ठाणे येथे पोहचल्यानंतर सदर मृत व्यक्तीचे नाव प्रल्हाद नाईक असल्याचे निष्पन्न झाले आहे.पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह कर्जत येथे उपजिल्हा रुग्णालयात आणला आहे.सदर व्यक्ती हा भिवपुरी रोड रेल्वे स्थानक परिसरात राहत होता आणि भीक मागून जीवन जगायचा. त्या व्यक्तीला जुलाब सुरु असल्याने तो उल्हास नदी येथे गेला होता आणि त्यावेळी नदीच्या कडेला अंगावरील पॅन्ट काढून बाथरूम साठी नदीच्या पाण्याजवळ गेला असता पाण्यात पडला आणि पाण्याचा अंदाज न आल्याने त्या व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा असा पोलिसांनी अंदाज वर्तविला आहे. कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात त्या व्यक्तीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आणि मृतदेह नातेवाईक यांच्या ताब्यात देण्यात आला.