माघी गणेशोत्स्वानिमित्त पालीत बॅनरबाजी ; विविध पक्षांच्या स्वागत बॅनरमुळे वाहतुकीला अडथळा

By Raigad Times    23-Jan-2023
Total Views |
Pali 1
 
सुधागड-पाली | दि. २३ जानेवारी २०२३ श्री गणेश चतुर्थी हा भाविकांसाठी वार्षिक सोहळा असतो. यावेळी श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी देशी परदेशी भाविक पाली शहरात येतात. माघी गणेशोत्सवासाठी पाली शहर सज्ज झाले असून, गणेश जन्मोत्सवानिमित्त सध्या पाली शहरात बॅनरबाजीचे पेव फुटले आहेत.
Pali 2 
 
अरुंद रस्त्यांवर, धोकादायक वळणावर लावलेले फलक जीवघेणे ठरू शकतात. भाविकांचे स्वागत करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी व इतरांनी आपली छबी दाखविण्याच्या नादात, जागोजागी फलक लावून शहराचे विद्रूपिकरण केल्याचे चित्र आहे. या छबी दाखविण्याच्या नादात नागरिकांना, वाहन चालकांना त्रास होत असल्याचे भान न ठेवल्याने नागरिक नाराज आहेत.

Pali 3
 
अनधिकृत जाहिरात फलक, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स इ. चे कारवाईबाबत मे. उच्च न्यायालयाचे संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आदेश आहेत. पाली शहरामध्ये लावण्यात आलेल्या फलकांची वाहतुकीसाठी अडचण होणार नाही याची दक्षता घेवून सदरचे फलक सुरक्षित ठिकाणी लावण्यात यावेत जेणेकरून बाहेर गावाहून
येणा-या भाविकांना त्रास होणार नाही, अशी मागणी होत आहे.