छोट्या भव्य पंडितचाही अखेर मृत्यु: रायगडमधील माणगाव जवळील अपघातात संपूर्ण कुटुंब संपले

By Raigad Times    19-Jan-2023
Total Views |
Accident
 
अलिबाग |  मुंबई गोवा महामार्गावर ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधून प्रवास करणार्‍या ९ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. जखमी लहान मुलाचेही अखेर निधन झाले आहे. या अपघातात हेदवी, सावंतवाडी आणि डावखोतमधील एकूण १० जणांचा मृत्यू झाला आहे.
 
मुंबईत कामानिमित्त असलेले पंडित कुटुंब जाधव कुटुंबासोबत नातेवाईकाच्या वर्षश्राद्धासाठी मुंबईहून गुहागरकडे इको गाडीने (नं. एमएच ४८ बीटी ८६७३) गावी निघाले होते. त्यांची गाडी मुंबई गोवा महामार्गावर माणगाव जवळील गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत आली असता रेपोली गावाजवळ ट्रक आणि इको कारचा अपघात झाला. या अपघातात निलेश पंडित (४५), त्यांची पत्नी नंदिनी पंडित (३५) , त्यांची कन्या मुद्रा पंडित (१२) यांचा जागीच मृत्यू झाला होता.
 
पहाटे झालेल्या अपघातात पंडित कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला होता. निलेश पंडित, नंदिनी पंडित आणि मुद्रा पंडित अशा तिघांचा मृत्यू झाला होता. जखमी असलेल्या भव्यनं आई वडील आणि बहिणीला गमावले होते. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र, चार वर्षाच्या भव्यची झुंज देखील अयशस्वी ठरली. उपचारादरम्यान त्याचा देखील मृत्यू झाला.
 
निलेश पंडित यांच्या पत्नी यांचे माहेर हेदवी होते. नंदिनी या मूळच्या जाधव कुटुंबातील होत्या. आजीच्या वर्षश्राद्धासाठी निघालेल्या नंदिनी पंडित, त्यांचे पती निलेश पंडित, मुलगी मुद्रा आणि मुलगा भव्य या चौघांसह अपघातामध्ये एकूण १० जणांचा मृत्यू झाला.
 
अपघातातील इतर मृतांची नावं
अमोल रामचंद्र जाधव, दिनेश रघुनाथ जाधव,कांचन काशिनाथ शिर्के, अनिता संतोष सावंत, लाड मामा, निशांत जाधव, यातील दिनेश जाधव हे नंदिनी पंडित यांचा सख्खा भाऊ आहे.