अलिबाग : पात्रुदेवीची मूर्ती चोरणारा चोरटा 24 तासात गजाआड; अहमदनगर येथे जाऊन पोलिसांनी ठोकल्या बेड्या

17 Jan 2023 15:35:06
danpeti
 
अलिबाग । अलिबाग कार्लेखिंड येथील पात्रुदेवीची मूर्ती चोरून नेणाऱ्या चोरट्याला अलिबाग पोलिसांनी 24 तासात बेड्या ठोकल्या आहेत. अहमद नगर येथे जाऊन त्याला अटक केली आहे.

Alibag Patrudevi
बुधवार 11 ते 12 जानेवारीदरम्यान अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळेस मंदिराचे कुलूप तोडून मंदिरातील पात्रू मूर्ती व इतर 7 हजार 800 रुपये किमतीचे साहित्य चोरुन नेले होते. या चोरीमुळे अलिबाग तालुक्यात खळबळ उडाली होती.

Alibag Patrudevi 2
या घटनेनंतर अलिबाग पोलिस निरीक्षक शैलेश सणस यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत 48 तासातच या चोरटयाला अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथून जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. दिलीप घोडके असे चोरटयाचे नाव असून त्याच्याकडून चोरी केलेल्या मुर्त्यांसह, दानपेटी, घंटा, तलवार आदी सर्वच मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.
 
अलिबागचे पोलिस निरीक्षक शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ओमप्रकाश कावळे आणि त्यांचे सहकारी पोलिस हवालदार शेलार यांनी ही कौतुकास्पद कामगिरी केली.
Powered By Sangraha 9.0