कोलाडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! बंद घरे फोडली

सोन्याचे दागिन्यांसह लाखोंचा ऐवज चोरीला

By Raigad Times    17-Jan-2023
Total Views |
Kolad Theft
 
रोहा । कडाक्याच्या थंडीचा फायदा उठवत कोलाड वरसगाव परिसरातील भीरा फाट्यानजीक असलेल्या हंसप्रीत रेसिडेन्सीमधील दोन घरे चोरट्यांनी फोडली. यामध्ये पावणेदोन लाखांच्या रोख रकमेसह 12 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास झाले आहेत. त्यामुळे परिसरात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Kolad Theft
 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोलाड वरसगाव परिसरातील भिरा फाट्याजवळ असणार्‍या हंसप्रीत रेसिडेन्सी सी-2 मध्ये राहणारे संतोष संजय सानप व मंगेश मनोहर राजीवडे यांच्या घरात चोरी झाली आहे. चोरट्यांनी दरवाजाचा कडी-कोयंडा व कुलूप तोडून घरातील कपाट फोडत सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली आहे.
 
दोन्ही घटनांमध्ये सुमारे 12 लाख रुपयांचे दागिने आणि एकूण 1 लाख 76 हजार रुपयांची रोख रक्कम चोरी झाली आहे. याप्रकरणी कोलाड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरु आहे.