साळाव नाका येथे दुचाकीला अपघात; एकजण ठार, दुसरा गंभीर जखमी

By Raigad Times    16-Jan-2023
Total Views |
Revadanda Accident 1 
 
रेवदंडा | मोटारसायकलवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. तर मागच्या सिटवर बसलेला जखमी झाला आहे. हा अपघात साळाव नाका येथे घडला.

Revadanda Accident 2 
मदनकुमार कन्हाई रजक (रा. पिंपरा, बगाही, औरगांबाद, बिहार सध्या रा. साळाव बिर्ला मंदिर नजीक चाळ) हा रविवार दि. १५ जानेवारीला सायंकाळी मुरूड-साळाव मार्गे रोहा रस्त्याने चेहेर गावाकडे दुचाकीने जात होता. त्याच्यासोबत यावेळी जयेंद्र मधूकर माळी (रा. चेहेर, ता. मुरूड) हे मागच्या सीटवर बसले होते.

Revadanda Accident 3
 
सावळा नाका येथे वळणावर मदनचा मोटर सायकलवरील ताबा सुटला आणि त्याची दुचाकी साईटच्या कठडयाला जावून धडकली. हा अपघात इतका जोरात झाला की डबलसीट बसलले जयेंद्र माळी हे कठडयाच्या बाजूला असलेल्या एका घराच्या छतावर जाऊन आदळले. या अपघातामध्ये चालक मदनकुमार कन्हाई याचा मृत्यू झाला असून जयेंद्र माळी हे जखमी झाले.
याबाबत रेवदंडा पोलिस ठाणे येथे मोटर वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे भा.द.वि.सं.क ३०४(अ) २७९,३३७,३३८ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून याबाबत फिर्याद रविंद्र मधूकर माळी रा. चेहेर यांनी दिली आहे. अधिक तपास रेवदंडा पोलिस ठाणे पो.नि. मुपडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार भोईर हेे करत आहेत.