गडब मध्ये विजेच्या कडकडासह ढगफुटी सदृश्य पाऊस

ओढ्याचे पाणी शिरले गावात,वाहनामध्ये ,दुकानामध्ये , जिवित हानी नाही

By Raigad Times    08-Sep-2022
Total Views |
rani
 
 
पेण | पेण तालुक्यातील गडब येथे विजेच्या कडकडाटसह ढगफुटी सदृश्य पाऊसडल्याने गावातुन जाणा-या औढ्याचे पाणी आपली पातळी ओळांडुन गावात शिरले या मुले गावातील अनेक घरात पाणी शिरले तर अनेक वाहनांभध्ये पाणी शिरले , तर काही दुकानामध्ये देखिल पाणी शिरले मात्र ग्रामस्थाचे सतर्कतेमुले जिवित हानी झाली नाही. मात्र या ढगफुटीसदृश्य पावसामुले जनजिवन मात्र विस्कळीत झाले.
 
rain
गडब येथे सायंकाळी वादळी वार्यासह, विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. आभाळ फाटल्याप्रमाणे पाऊस कोसळत होता. सर्वत्र ढग दाटून आल्याने व विजबत्ती गुल झाल्याने अंधाराचे सावट पसरले. अचानक आलेल्या या पावसाने सर्वांचीच त्रेधात्रिपीट उडवली तर गडब गावाचे पुर्वेकडे असणा-या डोगंरावर जोरदार ढगफुटी सदृश्य पाऊस पडला व हे पाणी गडब गावाचे मधुन जाणा-या ओढ्यातुन सरक्षक भिंत ओलांडुन गावात शिरले अचानक या ओढ्यातुन पाण्याचा लोट आला एवढ्या जोरदार पाणी आल्याने अनेकांचे वाहनामध्ये पाणी शिरले तर घरांमध्ये पाणी शिरले तर दुकांनामध्येही पाणी शिरले मात्र नागरिकांचे सतर्कतेमुले जिवित हाणी झाली नाही. पावसाचा जोर कमी झाल्यावर काही वेळात हे पाणी कमी झाले परंतु या पाण्या सोबत डोगंर उतारावरुन वाहुन आलेल्या माती मुले गावात चिखलांचे साम्राज्य पसरले तर
 येथील ओढ्यावर बांधलेल्या पुलांचे काही प्रमाणात नुकसानान झाले.
 
rain