खेळात राजकारण नाही मात्र राजकारणात हवेतच चितपट करण्याची क्षमता ठेवून आहे - आम. महेंद्र दळवी

By Raigad Times    07-Sep-2022
Total Views |
wadgaon kusti
 
रेवदंडा | खेळात कधीही राजकारण केले नाही, व इतरांनी सुध्दा करू नये असे सांगून मात्र राजकारणात हवेतच चितपट करण्याची क्षमता ठेवून असल्याचे ठोस प्रतिपादन अलिबाग-मुरूड-रोहा विधानसभा आम. महेंद्र दळवी यांनी वाडगांव येथील खुल्या व भव्य कुस्ती स्पर्धेचा शानदार शुभारंभ प्रसंगी उपस्थितांना संबोधीताना केले. तत्पुवी आम. महेंद्र दळवी यांचे हस्ते खुल्या व भव्य कुस्ती स्पर्धेचा शानदार शुभारंभ श्रीफळ वाढवून तसेच प्रथम कुस्तीचा प्रारंभ केला.
 
 
अलिबाग तालुक्यात वाडगाव येथे अलिबाग तालुक्यात वाडगाव येथे भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन हनुमान तालिम संघ व वाडगाव ग्रामस्थ यांच्या संयुक्त विदयमाने आयोजीत खुल्याव भव्य कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ प्रमुख अतिथी आम. महेंद्रशेठ दळवी यांचे हस्ते संपन्न झाला.
 
 
या कुस्ती स्पर्धेचे निमंत्रक हनुमान तालिम संघ वाडगाव अध्यक्ष चंद्रकांत ठाकूर, व अलिबाग तालुका कुस्तीगीर संस्था अध्यक्ष जयेंद्र भगत होते, यावेळी शिवसेना दक्षिण जिल्हा प्रमुख (शिंदे गट) प्रमुख राजाभाई केणी, रा.कॉ. जिल्हा पदाधिकारी शैलेश चव्हाण, वाडगाव ग्रा.प. सरपंच सरिता भगत, उपसरपंच निलम थळे, मारूती हडकर, बेलोशी ग्रा.प.सरपंच कृष्णा भोपी, दिपक भुसारी, भगवान धुळे, ऍड रत्नाकर पाटील, आदीची उपस्थिती होती.
 
 
वाडगाव येथील कुस्ती स्पर्धा संपुर्ण जिल्हात प्रसिध्दीस असल्याने या खुल्या कुस्ती स्पर्धेत जिल्हासह मुंबई, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, पनवेल, नवी मुंबई येथून नामाकिंत मल्लाचा सहभाग होता. या वर्षी पुणे हनुमान आखाडाचे मल्ल श्रीनिवास पाथरूट, पारनेरचे शिवछत्रपती कुस्ती संकुल मल्ल ॠषीकेश लांडे,लालमाती कुस्ती केंद्र लोणंद पुणे चे मल्ल गणेश कोकरे, गोदबा कुस्ती केद्र सोलापुरचे मल्ल सुरज मुलानी, गोदबा कुस्ती केद्र सोलापुरचे मल्ल दिपक गोफणे, हरियाणाचे साहिल पोगांण आदी नामवंत मल्लाची उपस्थिती होती. या कुस्ती स्पर्धेत नामांकित कुस्तीस प्रथम क्रमांकास गदा व रोख रक्कम २५ हजार रूपये, व्दितीय क्रमांकास रोख रक्कम १५ हजार रूपये व चषक, तृतीय क्रमांकास रोख रक्कम १० हजार रूपये व चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.