रत्नागिरीचे आमदार उदय सामंत हे रायगडचे नवे पालकमंत्री; आ. भरत गोगावले यांच्या पदरी पुन्हा निराशाच

By Raigad Times    25-Sep-2022
Total Views |
MLA
 
मुंबई । रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद उदय सामंत यांच्याकडे देण्यात आली आहे. सामंत हे शिंदे गटाचे आहेत. रायगडात या शिंदे गटाचे तिन आमदार आहेत. आ. भरत गोगावले प्रचंड इच्छुक आहेत. मात्र तरीही शिंदे सरकारनेही पालकमंत्रीपदाची जबाबदारी जिल्ह्याबाहेतच्या मंत्र्यावर सोपवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या आमदारांची निराशाच झाली आहे.
 
महाड, अलिबाग आणि कर्जत येथील आमदार सेनेचे असतानाही उध्दव ठाकरे सरकारने रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला दिले होते. यालाच आक्षेप घेत तेव्हा या तिन्ही आमदारांनी आघाडी सरकार आणि उध्दव ठाकरे यांच्याविरोधात पहिल्यांदा आवाज उठवला होता. पुढे हे तिन्ही आमदार शिेंदे गटाच्या पहिल्या बसमध्ये जाऊन बसले. दोन महिन्यांच्या ड्रामेबाजीनंतर शिंदे आणि भाजपचे सरकार सत्तेत आले.
 
महाडचे आमदार भरत गोगावले यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आजूबाजूल दिसू लागले. त्यामुळे शिंदे सरकारमध्ये आ. भरत गोगावले यांची पहिल्या यादीतच वर्णी लागेलअसे बोलले जात होते. पहिल्या यादीत नाव गोगावले यांचे नाव आले नाही. मग दुसर्या यादीची प्रतिक्षा सुरु झाली. दोनच दिवसांपुर्वी रायगडचा पालकपंत्री आपणच होऊ असे अलिबाग येथे भरत गोगावले यांनी सांगितले होते. अन्य आमदारांनह तेच म्हणटले होते. मात्र शनिवारी मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्रीपदे जाहिर केली. यात भरत गोगावले यांचे नाव नाही.
 
गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या पालकमंत्री मंडळाचा विस्तार शिंदे-भाजप सरकारने केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत आ. घोषणा केली आहे. रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबादारी उदय सामंत यांच्याकडे देण्यात आली आहे. मात्र रायगडात तिन आमदार असूनही पालकमंत्रीपदासाठी डावलल्यात आल्याचे चित्र आहे.