सराईत कार टेप चोरी करणार्‍या चोरट्यास पनवेल शहर पोलिसांनी घेतले ताब्यात

25 Sep 2022 13:35:38
police
 
पनवेल । पनवेल शहर परिसरात उभ्या असलेल्या चार चाकी वाहनाच्या गाडीच्या काचा फोडून आतून महागडे कार टेप ची चोरी करणार्‍या चोरट्यास पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .
 
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात मालमत्तेचे गुन्हे वाढले असल्याने सदर गुन्हे उघड करणेसाठी पोलीस आयुक्त , पोलीस सह आयुक्त , अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे , यांच्या सुचनेनुसार व पोलिस उप आयुक्त , परि 2,सहाय्यक पोलिस आयुक्त , पनवेल विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली प्राप्त सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे गाडीची काच तोडून कार टेप चोरी करणारा सराईत आरोपीचा पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. संजय जोशी (गुन्हे), पोउपनि अभयसिंह शिंदे,पोहवा रविंद्र राऊत,पोना परेश म्हात्रे,पोना महेंद्र वायकर,पोना विनोद देशमुख,पोना रविंद्र पारधी,पोशि विवेक पारासुर,पोशि प्रसाद घरत आदींच्या पथकाने सदर आरोपी नामे जुबेर रईस अहमद व. व. 32 रा. जीवदानी बिल्डिंग, मुंब्रा पोलिस स्टेशन जवळ, मुंब्रा याचा शोध घेत असताना सदरचा आरोपी हा कळवा परिसरात असल्याची माहिती मिळाल्याने प्राप्त माहितीच्या आधारे पनवेल शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाने सदर आरोपीला ताब्यात घेतले असता त्याने आता पर्यत शहरातील फिर्यादी जयेश संतोष म्हात्रे, रा टिळक रोड, पनवेल एमटीएनएल रोड परिसरातून कार टेप चोरी केल्याचे कबुल केल्याने चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पुढील तपास पनवेल शहर पोलीस करीत आहेत .

Powered By Sangraha 9.0