एन एम एम टी बस व वँगनर गाडीची समोरा समोर धडक,चालक जखमी

By Raigad Times    22-Sep-2022
Total Views |
NMMT bus
 
उरण |  उरण शहराकडून नवीमुंबई शहराकडे जाणार्‍या एन एम एम टी बस व वँगनर गाडीची समोरा समोर धडक झाल्याने सदर अपघातात वँगनर गाडीचा चालक जखमी झाला आहे.सदर अपघात हा गुरुवार 22 सप्टेंबर रोजी सकाळी 6-15च्या सुमारास घडला आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उरण शहरातून नवीमुंबई शहराकडे जाणार्‍या एन एम एम टी या प्रवाशी बस गाडीला करळ उड्डाणपूलावरुन विरुद्ध दिशेने येणार्‍या वँगनर गाडीनी समोरा समोर धडक दिली.सदर अपघातात वँगनर गाडीचा चालक जखमी झाला आहे.या अपघाताची माहिती मिळताच न्हावा शेवा वाहतूक पोलीस यंत्रणेच्या कर्मचार्‍यांनी तसेच न्हावा शेवा पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी घटना स्थळी धाव घेऊन जखमी चालकास तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करुन घेतले आहे.
सदर अपघात हा गुरुवार दि22 सप्टेंबर रोजी सकाळी ठिक 6-15 च्या सुमारास घडला असून एन एम एम टी बस गाडीतून नोकरदार वर्ग तसेच इतर प्रवासी प्रवास करत असल्याचे सांगण्यात येत आहे.या अपघाता संदर्भात न्हावा शेवा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भेट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी अधिक माहिती घेत आहेत.