करंजा समुद्र किनार्‍यावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला

By Raigad Times    22-Sep-2022
Total Views |
 dead body
 
उरण  |  करंजा समुद्र किनार्‍यावर अज्ञात व्यक्तीचा मृत देह बुधवारी आढळून आला आहे.सदर मुत देह हा पुरुषांचा असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
 
करंजा समुद्र किनार्‍यावर बुधवारी  अज्ञात व्यक्तीचा मृत देह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.या घटनेची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.यावेळी सदर अज्ञात व्यक्तीचा मृत देह समुद्राच्या पाण्यातून बाहेर काढण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा चाणजे ग्रुप ग्रामपंचायत सदस्य रवि कोळी यांनी पोलीस यंत्रणेला सहकार्य केले.
 
पुरुष जातीच्या व्यक्तीची सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला असून उरण इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात पोस्ट माटमसाठी नेण्यात आला आहे.सदर व्यक्तीच्या अंगावर शर्ट आणि हाप पंड असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.मृत देहाची ओळख पटली नसून पोलीस यंत्रणा तपास करत असल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी दिली.