रामदास कदम यांच्या विरोधात अलिबागेत शिवसेनेचे जोडेमारो आंदोलन

ठाकरे कुटुंबियांविरोधात वक्तव्याचा निषेध

By Raigad Times    21-Sep-2022
Total Views |
shivsena
 
अलिबाग | ठाकरे कुटुंबियांविरोधात वक्तव्याचा निषेध व्यक्त करीत बंडखोर नेते रामदास कदम यांच्या विरोधात आज शिवसेनेने अलिबागेत जोडेमारो आंदोलन केले.यावेळी कदम यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले होते.कदम यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील शिवसैनिकांनी यात सहभाग घेतला.
 
आज शिवसेना अलिबाग तालुका च्या वतीने रामदास कदम याचा जाहीर निषेध अलिबाग शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, शिवसेनाप्रमुख तसेच मा साहेबांनी ज्याच्यावर मुलाप्रमाणे प्रेम केले तो आता ठाकरे कुटुंबियांवर अपशब्द वापरतोय हे आम्ही सहन करणार नाही. चपलेने मरण्याचीच त्याची लायकी असल्याने त्याला चपलेने मारत आहोत. तो नालायक झाला असल्याचे सुरेंद्र म्हात्रे यांनी म्हटले.
 
यावेळी जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या सह अलिबाग शहर प्रमुख संदीप पालकर, अलिबाग विधानसभा संघटक सतीश पाटील, उप जिल्हा संघटक अजित पाटील,महिला शहर संघटीका राखी खरवले,युवा सेना पदाधिकारी, उप तालुका प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख आदी संघटनेचे पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.