पनवेल शहरात महिलेचा विनयभंग, गुन्हा दाखल

By Raigad Times    11-Sep-2022
Total Views |
molestation
 
 
नवीन पनवेल | पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सोसायटीतील महिलेचा गाऊन रहिवाशांसमोर फाडल्याने चाळीस वर्षे महिलेच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
यातील फिर्यादी महिला व आरोपी महिला एका सोसायटीमध्ये राहत असून आरोपी महिलेने फिर्यादीच्या मुलांना शिवीगाळ केली. यावेळी फिर्यादी आरोपीला जाब विचारण्यासाठी गेले असता तिच्या गाऊनला पकडून तिच्या घरामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.
 
यावेळी फिर्यादीने विरोध केला असता फिर्यादी महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने आरोपी महिलेने सोसायटीतील सर्व जमलेल्या रहिवाशां समोर गाऊन फाडला. व फिर्यादी महिलेस मारहाण करून तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र तोडून ते घेऊन गेली. या प्रकरणी आरोपी महिलेविरोधात विनयभंगासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.