अलिबाग : खंडाळा येथे भरधाव ट्रकची घराला ठोकर, घराचे मोठे नुकसान

By Raigad Times    11-Sep-2022
Total Views |
accident
 
 
अलिबाग | अलिबाग तालुक्यातील खंडाळा नाक्यावरील घराला  भरधाव ट्रकने ठोकर दिली, सुदैवाने घरातील माणसं सुखरूप आहे. घराचे आणि बाहेर उभ्या दुचाकीचे नुकसान झाले आहे.
 
शनिवारी रात्री ११.३० च्या सुमारास या अपघाताची घटना घडली. साळाव येथील ट्रक पेण अलिबाग रस्त्यावरुन जात होता. सदर ट्रक खंडाळे नाका येथे आला असता समोरून येणार्‍या वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या अमोल मोरे यांच्या घराच्या अंगणात घुसला.
 
यावेळी घराचे मोठे नुकसान झाले. तसेच अंगणात उभी असलेल्या दुचाकीचे देखील नुकसान झाले. अपघाता वेळी अमोल मोरे यांची आई आणि भाऊ घरातच झोपले होते. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. सदर अपघात होताच ट्रक चालक पोलिस ठाण्यात हजर झाला.