"गद्दारी केली नाही आम्ही शिवसैनिकच आहोत!": भरत गोगावले

By Raigad Times    08-Aug-2022
Total Views |
bharat gogavle
 
 
तळा | महाड पोलादपूरचे शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी नविन कार्यकारिणी संदर्भात सदिच्छा बैठकीचे आयोजन रविवार ७ ऑगस्ट २०२२ रोजी शिवसेना शहर प्रमुख राकेश वडके यांच्या निवासस्थानी तळा येथे करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, अरूण चाळके संपर्कप्रमुख अॅड.राजीव साबळे माणगाव तालुका प्रमुख मानकर वकील आदी मान्यवर उपस्थित होते.
 
यावेळी आमदार भरत गोगावले म्हणाले की, आम्ही गद्दारी केली नाही आम्ही शिवसैनिक आहोत शिंदे गटात असलो तरी बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेलो आहोत. महाआघाडीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर केलेली युती आम्हाला मान्य नव्हती. बाळासाहेबांनी यांच्याशी कधीही हात मिळवणी केली नाही. मात्र उध्दव ठाकरे यांनी महाआघाडीत मुख्यमंत्री पदाशिवाय काहिच केले नाही अडिच वर्षात फक्त यांच्या ताटाखालचे मांजर बनले राष्ट्रवादीच्या पवारांनी शिवसेना संपवण्याची तयारी केली होती हे लक्षात आल्यावर 40 आमदार आणि 10 अपक्ष आमदार बाहेर पडले. त्या पाठोपाठ 15 खासदार बाहेर पडले असताना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली नाही.
 
 
आम्ही मागच्या कालावधीमध्ये पालक मंत्रिपद हटाव मोहिम मोठ्या प्रमाणात भुमिका घेतली होती. परंतु वरिष्ठांचा साधा या बाबत फोन सुध्दा आला नाही. निधीसाठी आम्ही प्रयत्न करायचा आणि श्रेय मात्र त्यांनी घ्यायचे ही भुमिका ते करत होते. आता मनासारखे सरकार स्थापन झाले आहे.
 
 
जरी आम्हाला गद्दार म्हणत असले तरी आम्ही गद्दारी केलेली नाही हे जनता जाणून आहे. आज जे राज्यात परिस्थिती निर्माण झाली आहे. या बाबत अनेक वेळा मातोश्रीवर कल्पना दिली होती. जे रामायण, महाभारत घडले त्याचा मी साक्षीदार आहे. आम्ही 55 पैकी 40 आमदार आणि अपक्ष 10 आमदार एकत्र येवyन जनतेच्या हितासाठी निर्णय घेतला आहे. आम्ही आज ही स्व.बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघेंचे कट्टर शिवसैनिक आहोत. त्याचेच विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत.
 
आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलेलो नाही. पक्षांतर करणार नाही आता आम्ही जनतेच्या विकासासाठी हा निर्णय घेतला आहे. आज तुम्हाला ग्वाही देतो की श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव रोहा आणि तळा ह्या पाच तालुक्यासाठी शिवसेनेचे 3 आमदार आणि भाजपचे 3 आमदार एकुण सहा आमदार येवून मोठ्या प्रमाणात विकास कामे करणार आहोत.
 
 
तुम्हाला विकास कामे करण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. बाप बेटे तिघे जण असले तरी आम्ही सहाजण श्रीवर्धन मतदार संघात निधी कमी पडुन देणार नाही वाडी वस्ती वरील मतदार जी कामे सुचतील ती सांगा त्याला मंजूरी दिली जाईल. तळा शहराचा पाणीपुरवठा योजना तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी 9 कोटी 67 लाख रुपयांची मंजूरी दिली असून याचे श्रेय हे सेनेचेच असून वाढीव निधी देखील दिला जाईल याची चिंता करण्याचे कारण नाही.
 
 
पालकमंत्री आदिती तटकरे, खा. तटकरे यांनी उपमुख्यमंत्री यांच्या मदतीने अडचणी निर्माण केल्या असल्या तरी लवकरच पाणीयोजना येणारच यांचे श्रेय लाटू देणार नाही. राजकारणात कधी काय होईल ते सांगता येणार नाही. जरी तळा नगरपंचायत आपल्या हातून गेली असली तरी विकासनिधीची कमतरता पडू देणार नाही हा आमचा शब्द आहे बोलतो ते करुन दाखवतो.
जिल्हापरिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लक्ष द्या बाकी आम्ही बघतो. तत्कालीन जिल्हाप्रमुख या अगोदर राष्ट्रवादीवर आग पाखड करीत होते आता मुग गिळून गप्प बसले समजून जा.न समजायला मतदार, शिवसैनिक अज्ञान नाही. अनिल नवगणे यांचे नाव न घेता चांगलेच तोंड सुख घेतले. यावेळी मुलुख मैदानी तोफ जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. जिल्हाचे पालकमंत्री पदाची भुमिका मुख्यमंत्री शिंदे, भारत गोगावले यांच्यावर सोपवतील या बाबत शंका नाही, असे सांगितले.