संजय राऊतांना आज पुन्हा कोर्टात हजर करणार

पुन्हा ईडी कोठडी की न्यायालयीन कोठडी? याकडे लक्ष

By Raigad Times    08-Aug-2022
Total Views |
sanjay raut
मुंबई | शिवसेना नेते संजय राऊत यांना आज पुन्हा पीएमएलए कोर्टात हजर करण्यात येणार आहे. पत्राचाळ पुनर्विकासातील पैशांच्या अनियमिततेप्रकरणी राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. आज ईडी कोठडीचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे त्यांना आज पुन्हा न्यायाधीश एम.जी. देशपांडे यांच्यासमोर हजर केले जाणार आहे.
 
गेल्या दोन्ही सुनावणी दरम्यान एम.जी. देशपांडे यांनी संजय राऊत यांना ईडी कोठडी सुनावली होती. त्यामुळे आज पुन्हा ईडी कोठडीत रवानगी होते की, की न्यायालयीन कोठडी दिली जाते. याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.
 
ईडीने संजय राऊत यांना 1 ऑगस्ट रोजी अटक केली होती. प्रथम न्यायालयाने संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. त्यानंतर पुन्हा न्यायालयाने त्यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली.
 
काय आहे प्रकरण?
  • प्रवीण राऊत यांनी पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प घेतला मात्र त्यांनी तो प्रकल्प खासगी बिल्डरला विकला.
  • या घोटाळ्यातून प्रवीण राऊत यांना 112 कोटी रुपये मिळाले.
  • प्रवीण राऊत यांनी या रकमेपैकी एक कोटी 6 लाख राऊत कुटुंबीयांना दिले.
  • ईडीला संजय राऊत यांच्या चौकशीतून अधिक माहिती मिळाली.
  • प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्यात आणखी एक व्यवहार झाला होता.
  • प्रवीण राऊत यांनी वर्षा राऊत यांच्या बँक खात्यात 1 कोटी 8 लाख रुपये भरले होते.
  • याशिवाय संजय राऊत यांनी अलिबाग इथे विकत घेतलेल्या जमीन मालकाला एक कोटी 17 लाख रोख रक्कम दिली होती.
  • ईडीला या व्यवहाराबाबत अधिक चौकशीची गरज होती, म्हणूनच त्यांनी गेल्या वेळी संजय राऊत यांची कस्टडी मागितली होती.
  • आता आज पुन्हा संजय राऊत यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.