भारतीय नौदलात भरती जाहीर, त्वरित करा अर्ज

By Raigad Times    08-Aug-2022
Total Views |
Indian navy
 
मुंबई | सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय नौदलात भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा.
 
सदर भरती शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर या पदासाठी एकूण 50 जागा रिक्त असून ते भरणे आहेत.
 
शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह M.Sc/B.E/ B.Tech/M.Tech(कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर इंजिनिअरिंग/IT/सॉफ्टवेअर सिस्टम्स/ सायबर सिक्युरिटी/ सिस्टम ॲडमिनिस्ट्रेशन अँड नेटवर्किंग/ कॉम्प्युटर सिस्टम्स अँड नेटवर्किंग/ डेटा ॲनालिटिक्स/आर्टिफिशियल इंटेलिजन्स) किंवा MCA + BCA/BSc (कॉम्प्युटर सायन्स+IT)
 
वयोमर्यादा: जन्म 2 जानेवारी 1998 ते 1 जुलै 2003 दरम्यान
 
शुल्क: सदर भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात आलेले नाही.
 
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
 
ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख: 15 ऑगस्ट 2022
सदर भरतीसंदर्भात अधिक माहितीसाठी https://www.indiannavy.nic.in/ या भारतीय नौदलाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.