महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस कोसळणार; हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा

By Raigad Times    08-Aug-2022
Total Views |
Rain
 
रायगड | हवामान खात्याने पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ज्यामध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस बरसणार आहे. तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशार देण्यात आला आहे.
 
हवामान खात्याच्या इशाऱ्याप्रमाणे, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा येथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोकणात ऑरेंज अलर्ट आणि मराठवाडा आणि विदर्भात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही ठिकाणी पुरजन्य परिस्थितीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
 
दरम्यान, दोन दिवसांपासून पून्हा बरसायला लागणाऱ्या पावसामुळे अनेक भागात दैनंदिन व्यवहारांवर परिणाम दिसून आले आहेत. रत्नागिरीतील रघुवीर घाटात दरड कोसळली. जवळपास 15 दिवसांतली ही तिसरी घटना आहे. सदर घटनेमुळे सातारा जिल्ह्यातील 20 गावांचा रत्नागिरीशी संपर्क तुटला आहे. तसेच चिपळूनमध्येही सतत कोसळणाऱ्या पावसामुळे तेथील रस्ते जलमय झाले आहेत.