शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या होणार!

संभाव्य यादीत रायगडमधील एकाही आमदाराचे नाव नाही

By Raigad Times    08-Aug-2022
Total Views |
shinde fadanvis
मुंबई | शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंनी आपल्याच पक्षाशी बंडखोरी करून भाजपासोबत नव्याने सरकार स्थापन केले. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नव्हाता. त्यामुळे सर्वत्र शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जात होती. आता मंत्रिमंडळ विस्तारा उद्या सकाळी 11 वाजता होणार आहे. पण शिंदे-फडणवीस सरकारच्या संभाव्य यादीत रायगडमधील तिन्ही आमदारांपैकी एकाचेही नाव नाही. बंडखोरी करणार्‍या पहिल्या यादीतही तिन्ही आमदारांची नावे झळकली होती पण मंत्रिमंडळाच्या संभाव्य यादीत त्या आमदारांची नाव नसल्याने रायगडकरांच्या भुवया उंचावल्या आहेत.
 
तसेच मंत्रिमंडळ विस्तारानंतर 10 ते 17 ऑगस्टपर्यंत विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन बोलवण्यात येणार असल्याची माहितीसमोर येत आहे.
 
दरम्यान, ज्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार आहे. त्यांना आज संध्याकाळ पर्यंत मुंबईत येण्यासंबंधित निरोप देण्यात येणार आहे.
 
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमडळातील संभाव्य यादी
शिंदे गटातील संभाव्य मंत्री
  • दिपक केसरकर
  • दादा भुसे
  • अब्दुल सत्तार
  • संजय शिरसाठ
  • गुलाबराव पाटील
  • शंभुराज देसाई
  • संदिपान भुमरे
भाजप
  • देवेंद्र फडणवीस
  • चंद्रकांत पाटील
  • राधाकृष्ण विखे पाटील
  • प्रविण दरेकर
  • जयकुमार रावल
  • रविंद्र चव्हाण
  • नितेश राणे