धावत्या डंम्परने घेतला पेट; गव्हाण फाटा येथील दुर्घटना

By Raigad Times    27-Aug-2022
Total Views |
damparfire
 
उरण । गव्हाण फाटा येथील रस्त्यावर धावत्या डंम्परला अचानक आग लागण्याची घटना घडली आहे. सकाळी ठिक 7 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली.
 
गव्हाण फाटा ते चिरनेर या परिसरात मोठ्या प्रमाणात डम्पर मधून डेब्रिज, दगड माती ने आण करण्याची कामे सुरू आहेत. आज ( दि27 ऑगस्ट ) रोजी गव्हाण फाटा येथील रस्त्यावरुन मार्गक्रमण करणार्‍या डँम्परला अचानक आग लागण्याची घटना घडली.
डँम्परला आग कशामुळे लागली हे कारण समजू शकले नाही.