अपर पोलीस अधीक्षक, अतुल झेंडे, अलिबाग उपविभागीय पोलीस अधिकारी जगदिश काकडे, सहा.पोलीस निरिक्षक, राजीव पाटील यांनी चोरट्यांकडून हस्तगत केलेला मुद्देमाल रमेश कडवे यांना ताब्यात देतानाचे हे छायाचित्र
अलिबाग । दुचाकी स्वाराला रस्त्यात अडवुन त्याची लुट करुण फरार झालेल्या 5 जणांना मांडवा पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून साडे चार लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे लुटमार करणारे तरुण अलिबाग तालुक्यातील ग्रामिण भागतील असल्याने पालकांसाठी चिंतेचा विषय झाला आहे.
रोहित रमेश कडवे हा मिळकतखार मळा येथे राहणारा तरुण 7 जुलै रोजी आपल्या घरी जात होता. त्याची दुचाकी मळा रोडवरील उघडीवर आली असताना पाचजणांनी रोहित याला अडवले आणि मारहाण करुण त्याच्याकडील दोन सोन्याचे ब्रेसलेट व तीन सोन्याच्या अंगठया असा ऐवज घेवून ते फरार झाले होते.
याबाबत रमेश याने मांडवा सागरी पोलीस ठाणे येथे तक्रार केल्यानंतर भा.द.वि कलम 395,341,323 अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे स. पोलीस निरिक्षक राजीव पाटील यांची टिम या प्रकरण्याचा छडा लावण्यास कामाला लागली. अवघ्या सहा तासात आरोपींचा शोध घेवुन त्यांना अटक केली.
गौरव सुभाश शेळके ( वय22) रा.झिराड ता.अलिबाग, सम्राट सागर तोडणकर,(वय 24 ) रा.धोकवडे, गणेश सोपान साळुंखे, (वय-35) रा.झिराड, अक्षय सुरेश नाईक (वय 28) रा.विर्तसारळ आणि गणेश शाम पगारे (वय 23) वर्ष रा. तळकरनगर, रामनाथ अशी त्यांची नावे आहे. त्यांच्याकडून साडे चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.
मांडवा सारगरीच्या डी.पी.खाडे, विशाल शिर्के, एस.डी.मारकंडे एस.एस.ठाकुर, ए.डी.सोळसे, पी.आर.देशमुख, व्ही.आर.चव्हाण, जी.के.पाटील, पी.के.प्रधान, सी.एस.म्हात्रे, ए.व्ही.पाटील, पी.एच.घरत, एस.ए.पाटील, एन.यु.शेख टिमने ही कामगीरी पार पाडली.
दरम्यान, जिल्ह्यात घडणार्या लुटमारीच्या घटनांमध्ये जिल्ह्याबाहेरुन येवून चोर्या करणारे चोरटे असल्याचे अनेकदा समोर आले आहे. मात्र या प्रकरणार अलिबाग तालुक्यातील छोट्या गावातील 22 ते 34 वयोगटातील तरुणाचा सहभाग आढळल्याने पालकांसाठी चिंतेचा विषय आहे.