पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीद्वारे चार शाळांचे दुरुस्तीचे काम पूर्ण

By Raigad Times    25-Aug-2022
Total Views |
school 1
माणगांव : पॉस्को महाराष्ट्र स्टील प्रा. लि. ने त्यांच्या सी.एस.आर. उपक्रमांतर्गत चार शाळांच्या इमारतीची दुरुस्ती केली, यामध्ये कसबेवाडी, येलावडे, तासगांव आणि उंबर्डी या रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांचा समावेश आहे. माणगांवच्या पूर्वीच्या गटशिक्षणाधिकारी आणि रायगड जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शाळा दुरुस्तीची विनंती केली होती. जून २०२० च्या निसर्ग चक्रीवादळात शाळेचे मोठे नुकसान झाले होते, शासनाच्या अनुदानाअभावी दुरुस्तीचे काम प्रलंबित होते. तालुक्यातील अनेक शाळांच्या इमारतींची अवस्था बिकट झाली असून, काही शाळांची दुरुस्ती झाली असली तरी अजून बर्‍याच शाळांच्या इमारती अद्याप नादुरुस्त आहेत.

school 2
 
तासगांव आणि उंबर्डी या दोन शाळेच्या नुतनीकरण केलेल्या इमारतींचा उद्घाटन सोहळा दिनांक २५ ऑगस्ट २०२२ रोजी पोस्को कंपनीचे अधिकारी जसे कि कंपनीचे डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर, जनरल मॅनेजर, प्रशासन विभागाचे प्रमुख, सी.एस.आर. विभागाचे अधिकारी तसेच सरपंच, ग्रामसेवक, शाळेतील मुले व त्यांचे पालक आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पार पडला.

school 3
याप्रसंगी पोस्को कंपनी व्यवस्थापन म्हणाले कि, पॉस्को महाराष्ट्र स्टील आपल्या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमात सातत्याने पुढाकार घेत आहे. हे कार्य, समाजात शिक्षणाला प्रोत्साहन देण्याची आमची बांधिलकी दर्शवते. या नूतनीकरण केलेल्या शाळेमुळे ज्ञान मिळविण्यासाठी येथे उपस्थित राहणार्‍या विद्यार्थ्यांवर सकारात्मक प्रभाव कायम राहील. शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी तालुका स्तरीय सरकारी अधिकारी व ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.
याप्रसंगी शिक्षक व ग्रामस्थांनी पोस्को कंपनीच्या शाळा दुरुस्ती तसेच अन्य उपक्रम जसे शैक्षणिक साहित्य वाटप, फळझाडे वाटप, बेटी बचावो बेटी पढाओ अशा विविध उपक्रमांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पुढील काळातही अशाच समाजाभिमुख उपक्रमांची अपेक्षा व्यक्त केली.