विजेच्या धक्क्याने अलिबाग वेश्वी ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचा मृत्यू, गावकरी हळहळले

25 Aug 2022 19:11:28
 deth
 
अलिबाग : विजेच्या धक्क्याने वेश्वी ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली. अनिल शेळके असे या कर्मचार्‍याचे नाव आहे.
 
गणेशोत्सव तोंडावर आहे. त्यामुळे रस्त्यावरील लाईट सुरळीत सुरू रहावी म्हणून, वेश्वी ग्रामपंचायतीचे वायरमन अनिल शेळके (वय ५९) हे आज दुपारी एका पोलावर चढले होते.
 
काम करताना, अचानक विजेचा धक्का बसला आणि अनिल पोलावरून खाली कोसळले. विजेचा धक्का आणि उंचावरून कोसळला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अनिल यांच्या मृत्यने वेश्वी गावावर दुःखाचे सावट पसरले आहे
Powered By Sangraha 9.0